शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राज करणार मुख्यमंत्र्यांना लक्ष्य? अविनाश जाधव यांना पोलिसांनी मारहाण केल्याने असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 04:42 IST

स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन करणारे मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव व त्यांच्या सहका-यांना ठाण्यातील एका वरिष्ठ अमराठी पोलीस अधिका-याने कोठडीत मारहाण केल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे कमालीचे संतापले असून त्यांनी पुढील शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले आहे.

ठाणे : स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन करणारे मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव व त्यांच्या सहका-यांना ठाण्यातील एका वरिष्ठ अमराठी पोलीस अधिका-याने कोठडीत मारहाण केल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे कमालीचे संतापले असून त्यांनी पुढील शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले आहे. या सभेत राज हे ठाणे पोलिसांना आणि पर्यायाने गृहखाते सांभाळणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.एल्फिन्स्टन रेल्वे पुलावरील दुर्घटनेनंतर स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना १५ दिवसांत हटवण्याची मुदत राज ठाकरे यांनी रेल्वे व पोलीस प्रशासनाला दिली होती. १५ दिवसांत फेरीवाले हटले नाही, तर त्यानंतर मनसैनिक या फेरीवाल्यांना हटवतील, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यांच्या सूचनेनुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना मारहाण करून पिटाळून लावले. २१ आॅक्टोबर रोजी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल्याने सोमवार, २३ आॅक्टोबर रोजी त्यांना व त्यांच्या सहकाºयांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत एका अमराठी पोलीस अधिकाºयाने जाधव यांना मारहाण केली. न्यायालयाने जेमतेम १५ हजार रुपयांच्या जामिनावर जाधव यांची सुटका केली. त्यानंतर, फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक आंदोलन करण्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीच्या हमीकरिता जाधव यांच्याकडे प्रारंभी एक कोटींच्या जामीनदाराची मागणी करणारी नोटीस पोलिसांनी त्यांना बजावली होती. याबाबत, मनसेतून नाराजीचा सूर उमटला. तसेच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेतली. त्यानंतर, पाच लाखांचा जामीनदार देण्याचा फतवा पोलिसांनी काढला. न्यायालयाने काही हजार रुपयांच्या जामिनावर जाधव यांची मुक्तता केली असताना पोलिसांनी लाखो, कोटी रुपयांच्या जामीनदाराचा आग्रह धरणे, हा मनसैनिकांना हेतुत: त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. पुण्यात तर पोलिसांनी मनसैनिकांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. याआधीही टोलनाक्यावरील आंदोलनावेळी जाधव यांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला होता.गंभीर कलमांखाली दाखल गुन्हे आणि मोठ्या रकमेच्या जामीनदाराची सक्ती यामुळे राज ठाकरे आपल्या सभेत पोलिसांचा खरपूस समाचार घेणार आहेत. गुरुवारी मनसे पदाधिकाºयांनी राज यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत त्यांना महापालिकेतील ठेकेदारी-टक्केवारीच्या राजकारणाची इत्थंभूत माहिती दिल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले. लागलीच राज यांनी १८ नोव्हेंबरच्या जाहीर सभेची घोषणा केली. त्यामुळे महापालिका प्रशासनावरही राज टीकास्त्र सोडतील, असे संकेत मिळत आहेत. राज यांनी नुकतीच समृद्धी महामार्गबाधित शेतक-यांची भेट घेतली. या वेळी शेतकºयांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. याबाबतही ते या सभेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात?गृह व नगरविकास ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांकडे असल्याने राज हे मुख्यमंत्री फडणवीस यांनाच लक्ष्य करण्याची शक्यता आहे.ठाणे महापालिकेतील ठेकेदारी-टक्केवारीसंदर्भात सत्ताधा-यांविरोधात एका माजी महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती व न्यायालयातही जाण्याचा इशारा दिला होता. त्याउपरही काही हालचाली झालेल्या नसल्याने राज यांच्या सभेपूर्वी मुख्यमंत्री काही घोषणा करतात किंवा कसे, याचीही उत्सुकता आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे