शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

मतदानात पावसाचा नोटा, मीरा-भार्इंदरमध्ये नवमतदारांचा उत्साह : प्रभाग पद्धतीने वाढवला गोंधळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 06:53 IST

मीरा रोड : सतत कोसळणारा पाऊस, ढगाळ वातावरण आणि रविवारच्या सुट्टीमुळे मीरा-भार्इंदरच्या मतदानाला फटका बसला. यावेळी आधीपासूनच भरपूर जागृती करूनही मतदानाची ४७ टक्क्यांची सरासरीच कशीबशी गाठली गेली. गेल्यावेळेपक्षा मतदान साधारण एक टक्क्याने कमी झाले, असा प्राथमिक अंदाज आहे. पाऊस नसता किंवा त्याचे प्रमाण कमी असते तरी फरक पडला असता, असे ...

मीरा रोड : सतत कोसळणारा पाऊस, ढगाळ वातावरण आणि रविवारच्या सुट्टीमुळे मीरा-भार्इंदरच्या मतदानाला फटका बसला. यावेळी आधीपासूनच भरपूर जागृती करूनही मतदानाची ४७ टक्क्यांची सरासरीच कशीबशी गाठली गेली. गेल्यावेळेपक्षा मतदान साधारण एक टक्क्याने कमी झाले, असा प्राथमिक अंदाज आहे. पाऊस नसता किंवा त्याचे प्रमाण कमी असते तरी फरक पडला असता, असे मत निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मांडले.या परिस्थितीतही नवमतदारांनी उत्साहाने सहभागी होत आपला हक्क बजावला. चार वॉर्डांचा एक प्रभाग झाल्याने मतदान केंद्र शोधणे, यादीतील नाव शोधण्यात मतदारांचा गोंधळ उडाल्याचे दिसत होते. राजकीय पक्षातील संघर्ष, तणातणीचा परिणाम काही ठिकाणी दिसून आला, पण तेवढ्यापुरताच.ग्रामीण भाग आणि झोपडपट्टी परिसरात सकाळपासूनच चांगले मतदान झाले. दुपारनंतर शहरी भागातील मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली. पावसातही नवमतदार आणि तरुणांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. वृध्द, अपंगांनीही मतदानाचा हक्क आवर्जून बजावला.चार उमेदवारांना मतदान करायचे असल्याने आणि त्याशिवाय मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नसल्याने ठिकठिकाणी मतदारांचा गोंधळ उडालेला दिसत होता. काही ठिकाणी उमेदवारांची संख्या कमी असल्याने चार स्वतंत्र मतदान यंत्रे नव्हती. अनेक मतदारांनी तीन ठिकाणीच बटन दाबल्यावर केंद्रातील मदतनीस त्यांना समजावून सांगत होते. अधिक उमेदवार असलेल्या प्रभागात मतदारांचा आपल्या पसंतीच्या उमेदवाराची नावे किंवा चिन्ह शोधण्यात वेळ जात असल्याने कर्मचारी त्यांना घाई करत होते. सकाळपासून पावासाचा जोर वाढत असल्याने मतदार बाहेर पडतील की नाही, या चिंतेने उमेदवार व राजकीय पक्ष धास्तावले होते. दुपारपर्यंत अपेक्षित आकडा गाठला न गेल्याने मतदारांना बाहेर काढण्यासाठी फोन करणे, घरोघर जाऊन आग्रह करणे, सोशल मीडियातून मेसेज पाठवणे असे मार्ग अवलंबले गेले. मतदान केंद्रापर्यंत मतदारांच्या ने-आणीसाठी वाहने पुरवण्यावर आचारसंहितेनुसार बंदी आहे. तरीही नंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि उमेदवारांनी वाहने तैनात केली होती. पाऊस असल्याने बहुतांश मतदारांनीही या ‘सेवेचा’ लाभ घेतला.छायाचित्रणाला फाटा?मतदान केंद्रांवर छायाचित्रण करणारे पालिकेचे कॅमेरामनच अनेक ठिकाणी नव्हते. त्यामुळे केंद्राच्या परिसरात कोण येते आहे, कोण जाते आहे, कार्यकर्ते चिन्हासह घुटमळत आहेत का, याचे छायाचित्रणच होत नव्हते. काही ठिकाणी उमेदवार परस्परांवर आरोप करत होते. त्यातून काही मतदानकेंद्रांवर उमेदवार व पोलीस कर्मचाºयात खटके उडाले. प्रसंगी जोरदार बाचाबाची आणि आरोप- प्रत्यारोप झाले. परंतु छायाचित्रण करणारेच कोणी नसल्याने या घटनांना पुरावाच तयार झाला नाही.मेहतांना वेगळा न्याय?प्रभाग १२ मध्ये आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेत मतदानाची वेळ संपण्याआधी सर्व उमेदवारांना बाहेर काढण्यात आले. परंतु वेळ संपल्यावरही भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांना मतदान केंद्राच्या आवारात पोलिसांनी प्रवेश दिल्याने अन्य उमेदवार व कार्यकर्ते संतप्त झाले.पोलिसांच्या बोटचेपेपणाचा निषेध करत मोठी गर्दी झाल्याने सौम्य लाठीमार करून गर्दीला पांगवण्यात आले. मेहतांच्या शाळेत मतदान केंद्र ठेवलेच कशासाठी? असा प्रश्न अन्य उमेदवारांनी केला.तयारी मतमोजणीचीच्सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून पाच ठिकाणी आठ केंद्रांवर मतमोजणीला सुरूवात होईल. यातील तीन ठिकाणी दोन मोजणी केंद्रे आहेत.च्साधारणत: तासाभरात पहिला निकाल हाती येईल आणि दुपारी अडीच ते तीनपर्यंत सर्व मोजणी पूर्ण होईल, असा अंदाज आहे.अउमेदवारांची माहितीप्रत्येक मतदान केंद्रात फलकावर रिंगणातील उमेदवारांचे शिक्षण, गुन्हे, संपत्तीची स्थिती यांची माहिती लावलेली होती. काही मतदार ते वाचताना दिसत होते.माझी निशाणी...मतदान केंद्र परिसरात येणाºया मतदारांना काही ठिकाणी उमेदवार आपली निशाणी सांगत होते. मलाच मतदान करा, असा आग्रह ते आणि त्यांचे समर्थक करत होते. अनेक ठिकाणी तर भर पावसातही सर्वपक्षीय उमेदवार कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उभे राहून मतदारराजाला विनवणी करत होते. उमेदवारांत जेथे खेळीमेळीचे वातावरण होते, तेथे प्रसंगी विनोद झडत हास्याच्या लकेरीही उमटत होत्या.