शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धोधो पावसातही पाण्यासाठी वणवण!

By admin | Updated: July 17, 2017 01:05 IST

एकीकडे पाऊस धोधो बरसत असला, तरी पिण्याच्या पाण्यासाठी नांदिवली गाव, मीनल पार्क प्रभागातील टॉवरवासीयांची चांगलीच वणवण सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : एकीकडे पाऊस धोधो बरसत असला, तरी पिण्याच्या पाण्यासाठी नांदिवली गाव, मीनल पार्क प्रभागातील टॉवरवासीयांची चांगलीच वणवण सुरू आहे. महिनाभर या ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. परिणामी, रहिवाशांना बोअरिंग आणि टँकरचा आधार घ्यावा लागला असून येथील रस्ताही दलदलीत सापडल्याने त्यांची पायवाटही बिकट झाली आहे. गटारांच्या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने या ठिकाणी साथीचे आजारही बळावले आहेत. केडीएमसीत समावेश झालेल्या २७ गावांमध्ये नांदिवली गाव, मीनल पार्क हा प्रभाग येतो. या ठिकाणी रविकिरण सोसायटी असून या सोसायटीअंतर्गत ४० टॉवर बांधण्यात आले आहेत. परंतु, आजघडीला येथील बहुतांश टॉवरमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. महिनाभर ते टँकर आणि बोअरिंगच्या पाण्याचा वापर करत आहेत. केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाकडून लाखो रुपयांची बिले पाठवली जातात. ते रहिवासी भरतातही. पण, पाण्याची कायम बोंब असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे या परिसरातील चाळींना मुबलक पाणी आहे. पण, टॉवरवासीयांना पाणी नाही. अखेर, या रहिवाशांना चाळींचा आधार घ्यावा लागला आहे. विकासकाचे याकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब असताना दुसरीकडे या ठिकाणी असलेल्या रस्त्यांची खड्ड्यांनी पुरती चाळण झाली आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने या दलदलीतून वाट काढतच संबंधित रहिवाशांना येजा करावी लागत आहे. येथील स्मृती टॉवर आणि त्या परिसरातील अन्य टॉवरकडे जाण्यासाठी गटाराच्या पाण्यातून जावे लागते. दलदलीमुळे डासांची पैदास होऊन स्मृती टॉवरमधील ६ ते ७ जण डेंग्यूने आजारी असल्याचे त्यांनी सांगितले.