शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात या वेळी जास्त पाऊस

By admin | Updated: May 12, 2016 02:04 IST

प्राथमिक पूर्वानुमानानुसार राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के जास्त पाऊस अपेक्षित आहे. कोकण विभागात सरासरीपेक्षा २७.५ टक्के जादा पाऊस पडण्याची शक्यता असून जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांत पावसाचा जोर

ठाणे : प्राथमिक पूर्वानुमानानुसार राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के जास्त पाऊस अपेक्षित आहे. कोकण विभागात सरासरीपेक्षा २७.५ टक्के जादा पाऊस पडण्याची शक्यता असून जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांत पावसाचा जोर राहील, असे प्रादेशिक हवामान खात्याचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी बुधवारी ठाणे येथे सांगितले. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पालिका, नगर परिषदा तसेच विभागांना या वेळच्या पावसाचे भाकीत पाहता आपत्तीच्या दृष्टीने चांगले नियोजन करण्याचे निर्देशही दिले. शाळा-महाविद्यालयांतील एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांचादेखील आपत्ती निवारणात कसा सहभाग वाढेल, हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. ठाणे शहर व जिल्ह्यात अतिवृष्टीने यापूर्वीदेखील पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही इमारती ढासळून जीवितहानी झाली आहे. यासाठी कोणत्याही परिस्थितीत २० ते २५ मेपर्यंत सर्व पालिका आणि नगर परिषदांनी आपल्या भागातील जीर्ण, मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण करावे तसेच योग्य पद्धतीने नोटिसा द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.कल्याण-डोंबिवली परिसरात ३०० अतिधोकादायक इमारती असल्याची माहिती आयुक्त ई. रवींद्रन यांनी या वेळी दिली. तसेच एनडीआरएफचे पथक आपत्तीच्या वेळी अधिक लवकर कसे पोहोचेल, हे पाहण्याची सूचना त्यांनी केली. भातसा परिसरात वायरलेस यंत्रणाभातसा परिसरात वायरलेस यंत्रणा नसल्याने मोबाइलच्या रेंजवर अवलंबून राहावे लागते आणि पाणीसाठ्याची माहिती देण्यासाठी शहापूरला जावे लागते, असे या वेळी जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भातसा परिसरात तात्पुरत्या स्वरूपात अशी यंत्रणा बसवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.जिल्ह्यात पावसाळ्याच्या दरम्यान येणाऱ्या आपत्तीत सर्व पालिकांच्या नियंत्रण कक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी योग्य समन्वय ठेवावा तसेच कोणत्याही परिस्थितीत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपत्तीशी संबंधित अतिरंजित व चुकीच्या बातम्या जाणार नाहीत, याकडे लक्ष ठेवावे असे सांगितले.आसनगाव तालुक्यात एप्रिलअखेर तीव्र पाणीटंचाई भेडसावत असतानाच ११ मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आगमन झालेल्या पावसाने ऐन उष्णतेत शहापूरकरांनी सुखद गारवा अनुभवला. तालुक्यातील किन्हवली परिसरातील अस्नोली, मालेगाव या परिसरांत सौम्य गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. मात्र, या पावसामुळे शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. सरपण, शेण, गुरांचा चारा भिजून चिंब झाल्याने गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, तरीही बळीराजाच्या लवकर आगमनाने शेतकरी सुखावला आहे.