शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण तालुक्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:15 IST

भातसा, काळू, उल्हास नद्यांना पूर : शेकडो घरे पाण्याखाली

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील भातसा, काळू व उल्हास या तिन्ही नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणच्या चाळी पाण्याखाली गेल्या असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. खडवली नदीकाठच्या इंदिरानगर, जू गाव, आदिवासी आश्रमशाळा परिसर, स्वामी समर्थ मठ परिसर येथील ७० ते ८० घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. जू गावातील ५८ जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली.खडवलीतील भातसा नदीला पूर आल्याने नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने खडवली-पडघा वाहतूक ठप्प झाली आहे. खडवली नदीकाठच्या इंदिरानगर, जू गाव, आदिवासी आश्रमशाळा परिसर, स्वामी समर्थ मठ परिसर येथील ७० ते ८० घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पहाटे ४ वाजता रहिवासी साखरझोपेत असताना घरात पाणी शिरायला सुरुवात झाली. यामुळे त्यांना घरातील सामानही इतरत्र हलवता आले नाही. ग्रामस्थांनी त्यांना सुरक्षितस्थळी हलवले. तसेच त्यांच्या निवाऱ्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था केली.भातसा नदीलगतच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली. जू गावाला पुरामुळे पाण्याचा वेढा पडला होता. यामुळे तेथे अडकलेल्या ५८ जणांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफचे पथक खडवलीत दाखल झाले. हेलिकॉप्टरद्वारे त्यांची सुटका करण्यात आली.रुंदेजवळील काळू नदीवरील पुलावर शनिवारपासूनच पाणी आहे. त्यामुळे १० ते १२ गावे संपर्काबाहेर आहेत. तसेच याच काळू नदीवर वासुंद्री गावाजवळील पूलही शनिवारपासून पाण्याखाली असल्याने सांगोडा, कोंढेरी, मोस, वासुंद्री व निंबवली या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून तेथील ग्रामस्थ या पावसाच्या पुराचा फटका सहन करत आहेत.टिटवाळा रेल्वेस्थानक ते गणपती मंदिर या रस्त्यावर शिव मंदिरालगत असणाºया पुलावरून पाच ते सहा फूट काळू नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, टिटवाळा मंदिर परिसरातील लोक पलीकडे, तर रेल्वेस्थानक परिसरातील नागरिक अलीकडे अडकून पडले आहेत. पाणी तुंबल्याने नारायणनगर रोडवरील गणेशकृपा चाळीतील २५ घरे पाण्याखाली आहेत. तर, सांगोडा रोड येथील २०० खोल्या पाण्याखाली गेल्या होत्या. ‘रिजन्सी सर्वम’ या सोसायटीतही पाणी शिरल्याने तेथील रहिवासी भयभीत झाले आहेत. या सोसायटीच्या काही इमारती व क्लब हाउस हे नाल्याच्या कडेला असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले.टिटवाळा स्थानकातील रेल्वेरूळांमध्ये पाणी असल्याने रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. या ठिकाणी स्थानिक पोलीस, नागरिक व सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते लोकांना मदतीचा हात देताना दिसत आहेत. विनायक आणि गजानन काळण यांनी आपल्या होड्यांद्वारे नागरिकांना येजा करण्यासाठी मदत केली.बारवी धरणाचे पाणी सोडल्याने आणखी पूरसदृश परिस्थिती निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. पुराचे पाणी बघण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली. पूरसदृश परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना येथील विद्यामंदिर शाळेत हलवले असून, तेथे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्थानिक नगरसेविका व उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी केली आहे.प्रस्तावित डम्पिंगची जागा पाण्याखालीमांडा-टिटवाळा येथील सांगोडा रोडलगतच्या स्मशानभूमी परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने येथील चाळींतील २०० ते ३०० घरे पाण्याखाली गेली आहेत. मात्र, याच ठिकाणी केडीएमसी डम्पिंग ग्राउंड उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याविरोधात येथील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलनही छेडले होते.दरम्यान, तीच जागा सध्या काळू नदीला पूर आल्यामुळे पाण्याखाली गेली आहे. थोडी जरी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, तरी हा परिसर पाण्याखाली जातो. यंदा १५ दिवसांत तीन वेळा ही जागा पाण्याखाली गेली? त्यामुळे अशा जागी महापालिका डम्पिंग ग्राउंड उभारून काय साध्य करणार आहे, असा सवाल केला जात आहे.