शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

विसर्जनाला पाऊसफुलांचाही वर्षाव

By admin | Updated: September 22, 2015 03:43 IST

गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... पुढल्या वर्षी लवकर या... च्या गजरात ठाणे जिल्ह्यात सोमवारी सुमारे ५४ हजार गणरायांसह १७ हजार १६४ गौरार्इंचे विधिवत विसर्जन करण्यात आले.

ठाणे : गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... पुढल्या वर्षी लवकर या... च्या गजरात ठाणे जिल्ह्यात सोमवारी सुमारे ५४ हजार गणरायांसह १७ हजार १६४ गौरार्इंचे विधिवत विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, या वेळी अनेक गणेशभक्तांनी पर्यावरणीय दृष्टिकोन बाळगून कृत्रिम तलावात विसर्जनास पसंती दिली. दरम्यान, न्यायालयाच्या दट्ट्याचे पोलिसांनी चांगलेच पालन केल्याचे दिसून आले. सायलेन्स झोन परिसरात शांतता राखण्यात पोलिसांना काहीसे यश आले. संध्याकाळी पावसाने ठाण्यात दमदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गोवेली येथे विसर्जन तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला.गुरुवारी प्रतिष्ठापना केलेल्या ५ दिवसांच्या गणरायाला सोमवारी भाविकांनी अत्यंत भक्तिभावाने निरोप दिला. शहरातील अनेक तलावांच्या ठिकाणी तसेच खाडीकिनारी निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन केंद्रांवर तसेच गणेशमूर्ती दान केंद्रांवर भाविकांनी आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन केले. अनेक स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक भाविकांनी कृत्रिम तलाव आणि मूर्तिदान केंद्रांचा वापर केला. पर्यावरणाच्या हानीसंदर्भात या वर्षी प्रथमच जनजागृती झाल्याचे दिसून आले. ठाणे पोलीस आयुक्तालयात १२९ सार्वजनिक आणि ४४ हजार २८७ खासगी गणेशमूर्तींचे तर १३ हजार ९७८ गौरार्इंचे विसर्जन करण्यात आले. तर, ग्रामीण जिल्ह्यामध्ये २१० सार्वजनिक आणि ९ हजार ३१० खासगी गणेशमूर्तींचे तसेच ३ हजार १८६ गौरार्इंचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, या वर्षी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी ठाणे पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. एसआरपी, होमगार्ड, आणि इंडो तिबेटीयन पोलिसांच्या बंदोबस्तामुळे शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील अनेक सायलेन्स झोनच्या बाबतीत पोलीस अधिकच कार्यक्षम असल्याचे दिसून आले. अनेक सायलेन्स झोनच्या ठिकाणी तैनात केलेले पोलीस अधिकारी मिरवणुकांमधील बॅण्ड पथकाला वाद्य बंद करण्याच्या सूचना देत होते. विशेष म्हणजे न्यायालयाच्या दणक्यामुळे मिरवणुकांमधून डीजे हद्दपार झाल्याचे दिसून आले. तसेच मासुंदा तलाव, उपवन तलाव, रायलादेवी, नीलकंठ वुड्स, खारेगाव, पारसिक रेतीबंदर, कळवा खाडी, कोलशेत खाडी आदी ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची धूम दिसून आली. भिवंडीत १०४५ गौरींसह ४३५० गणेशमूर्तींचे विसर्जनभिवंडी : शहरातील विविध तलावांत ४३५० गणेशमूर्तींचे व १०४५ गौरींचे विसर्जन झाले. यामध्ये २३ सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश होता. शेलार येथे कामवारी नदीत गणेशघाट व टिळकघाट येथे शहरातील बहुतांशी गणेशभक्तांनी मूर्तींचे विसर्जन केले. तर वऱ्हाळा तलाव, कामतघर व फेणे तलाव, टेमघर तलाव, नारपोली तलाव आदी ठिकाणी महानगरपालिकेने विसर्जनासाठी तराफा व जीवनरक्षक पथकाची सोय केली होती.गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप मुुंब्रा : पाहुणचाराकरिता आलेल्या गौरी तसेच मागील पाच दिवसांपासून भक्तांच्या पाहुणचाराने, भक्तिभावाने तृप्त झालेल्या मुंब्रा-कौसा परिसरातील ८७५ गणराय मूर्तींना येथील विसर्जन महाघाट तसेच विविध खाडीकिनारे आणि तलावांमध्ये पुढच्या वर्षी लवकर या... जयघोषात वाजतगाजत, टाळमृदंगाच्या गजरात भावपूर्ण निरोप देण्यात आला.टाळमृदंगाच्या गजरात गौर आणि बाप्पाला निरोप टिटवाळा : कल्याण ग्रामीण भागातील पाच दिवसांच्या बाप्पाला गौरी मातेसोबत जड अंत:करणाने साश्रुनयनांनी व भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप दिला. टाळमृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात गौरीमाता व गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यातील सार्वजनिक २६, घरगुती ६३४ व गणपतींपाठोपाठ पाहुण्या आलेल्या ३९८ गौरीमातांना निरोप देण्यात आला. फळेगाव येथील ओढा, खडवली भातसा नदी, पाचवा मैल घाट, रुंदे काळू नदीवर, गुरवली व टिटवाळ्याजवळ काळू नदी घाट, टिटवाळा हनुमान मंदिर तलाव, उतणे गाव तलाव येथे विसर्जन करण्यात आले.टोकावडेत पाच दिवसांच्या गणेशाचे विसर्जन!तालुक्यात अतिउत्साहात गणेशोत्सव पार पडत असून आपल्या लाडक्या पाचदिवसीय बाप्पाला निरोप देण्यात आला. टोकावडे, मुरबाड, शिरोशी, तळवली, सरळगाव, शिवळे इत्यादी गावांसह संपूर्ण मुरबाड तालुक्यातून चार ते पाच हजार मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.तालुक्यातील गावांमध्ये गणेश विसर्जन होत असताना कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये, यासाठी मुरबाड व टोकावडे पोलीस धुमाळ, कोकाटे, बांगर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच डीजेच्या तालावर नाचत विसर्जन सोहळा पार पडला.