शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पावसाने जरी खेळ मांडला..तरी अभिनय कट्टा एकपात्रीच्या जुगलबंदीने रंगला'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 16:37 IST

भर पावसातही खंड न पडता अभिनय कट्टा पुन्हा उभा राहिला.

ठळक मुद्देअभिनय कट्टा रंगला एकपात्रीच्या जुगलबंदीने भर पावसातही खंड न पडता अभिनय कट्टा पुन्हा उभा राहिलाअशा अडथळ्यांवर आम्ही मात करत राहू : किरण नाकती

ठाणे : १ जुलै रोजी पाऊस ठाणेमुंबईत बेभान पाने बरसला.आणि त्याच दरम्यान ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीतील सोन्याचं पान असलेला अभिनय कट्टा संपूर्ण पाण्याखाली होता.पुन्हा एकदा पाऊसामुळे ह्या चळवळीत खंड पडतो की के असे सर्वांना  पुन्हा वाटले.पण अभिनय कट्ट्याचे कलाकार संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा ह्या परिस्थितीतून उभे राहिले.आणि कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणे मोडला जरी संसार..मोडला नाही कणा.. ह्या कवितेला सार्थ असा कट्टा क्रमांक ४३६ सादर झाला.

     अभिनय कट्ट्यांचा ४३६ पर्यंतचा प्रवास हा अनेक अडथळ्यांचा सामना करून झाला त्याचे करण म्हणजे येथील कलाकारांचा कलेविषयीचे प्रामाणिक प्रेम आणि रसिक मायबाप प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद.अभिनय कट्टा क्रमांक ४३६ म्हणजे अभिनय कट्ट्याच्या एकपात्री सादरीकरणाची जबरदस्त जुगलबंदी.जणू काही बाहेर बरसणाऱ्या त्या पावसाला आपल्या अभिनयसामर्थ्याने अभिनय कट्ट्याचे कलाकार आव्हान देत होते.सादर कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याच्या कलाकार माधुरी कोळी ह्यांनी केले. बालकलाकार *अमोघ डाके ह्याने  'ज्योतिषी' एकपात्रीने कट्ट्याची सुरुवात केली.त्यानंतर शुभांगी भालेकर ह्यांनी 'मुखवटा', न्यूतन लंके हिने 'खर सांगायचं तर', अभय पवार ह्याने 'लग्नानंतरचे प्रेम', रोहिणी थोरात ह्यांनी 'एअर होस्टेस', प्रतिभा घाडगे ह्यांनी 'खरच मोबाईलची गरज आहे का', सई कदम हिने 'ती फुलराणी', सहदेव कोळम्बकर ह्याने 'मी कधी कुणाक काय सांगतय का' आणि परेश दळवी ह्याने 'मी रंगकर्मी' ह्या एकपत्रीच्या सादरीकरण केले.  सदर कार्यक्रमात कट्टा क्रमांक ४३५ वरील *फिल्मी चक्कर स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले.प्रथम क्रमांक 'जिस देश माई गंगा रेहता है' (कदिर शेख,विद्या पवार,अतिष जगताप), द्वितीय क्रमांक 'जुदाई' (सहदेव साळकर,अभय पवार,माधुरी कोळी) आणि उत्तेजनार्थ 'रुपकी राणी चोरोका राजा' (रोहिणी थोरात, प्रतिभा घाडगे, दत्तराज सकपाळ) ह्या सादरीकरणाना देण्यात आला. अभिनय कट्टा कधी थांबला नव्हता आणि कधी थांबणार नाही..कठीण परिस्तिथीवर मत करून रसिकमायबापांचा मनोरंजनासाठी पुन्हा उठून उभा राहतो तोच सच्चा कलाकार.प्रत्येक पावसात ही परिस्थिती निर्माण होते.पण अभिनय कट्ट्याच्या कलाकार थांबत नाही.आजचा कट्टा हे त्याच उदाहरण आहे.मोजक्या तांत्रिक गोष्टीच्या आधारे आजची एकपत्रीच्या हुगलबंदी रंगली.आपले प्रेम आशीर्वाद असेच राहुदेत जेणेकरून अशा अडथळ्यांवर आम्ही मात करत राहू असे आवाहन अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी उपस्थित प्रेक्षकांना केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक