शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सुनेपासून ताटातूट झालेल्या आजीबार्इंना रेल्वेकडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 05:28 IST

ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात तारीख असल्याने न्यायबंदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या अक्कलकोट येथील ७० वर्षीय आजीबाई आणि तिच्या सुनेची मुलाच्या भेटीनंतर घरी परताना ठाण्यात ताटातूट झाली.

- पंकज रोडेकर।ठाणे : ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात तारीख असल्याने न्यायबंदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या अक्कलकोट येथील ७० वर्षीय आजीबाई आणि तिच्या सुनेची मुलाच्या भेटीनंतर घरी परताना ठाण्यात ताटातूट झाली. त्यानंतर ती आजीबाई कसेबसे ठाणे रेल्वे स्थानकात आली. याचदरम्यान, रेल्वे प्रशासनाने तिच्या सुनेचा शोध घेतला. पण, ती शोधून न सापडल्याने अखेर तिला मदत म्हणून रेल्वे तिकीट आणि खर्चाला पैसे देऊन एक्सप्रेसमध्ये बसवून घरी धाडले.लक्ष्मीबाई (नाव बदलेले आहे) आणि त्यांची सून या दोघी तळोजा जेलमध्ये न्यायबंदी असलेल्या मुलाची शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर करण्याची तारीख असल्याने त्याला भेटण्यासाठी सकाळी ठाण्यात आल्या. दुपारी भेट झाल्यानंतर दोघीही पायी ठाणे रेल्वे स्थानकाकडे घरी जाण्यासाठी परताना त्या ठाणे बाजारपेठेत झालेल्या गर्दीत रस्त्याच्या वेगवेगळ्या बाजूला गेल्या. याचदरम्यान, गर्दीतून आजीबाई सुनेच्या दिशेने जात असताना, अचानक दोन-तीन बस आणि एका मागून एक आल्याने काही वाहनांमुळे त्यांची ताटातूट झाली. गर्दी कमी झाल्यावर आजीबार्इंनी सुनेचा शोध घेतला. मात्र, ती न सापडल्याने मोठ्या धीराने त्यांनी लोकांना विचारत कसेबसे ठाणे रेल्वे स्थानक गाठले. तोपर्यंत सांयकाळचे ५.३० वाजले होते. सून रेल्वे स्थानकात असेल म्हणून त्यांनी ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक कार्यालयामार्फत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही दाद देत नसल्याने केविलवाण्या अवस्थेत असलेल्या आजीबार्इंना रेल्वे प्रशासनाने धीर देऊन विचारपूस केली. त्यावेळी आजीबाई अक्कलकोट येथे राहणाºया असल्याचे समोर आले.आजीबार्इंच्या कपड्यांवरून त्या गरीब घरातील असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांच्याकडील एका पिशवीत पाण्याची बाटली आणि अवघी दहा रुपयांची नोट होती. याचदरम्यान, अक्कलकोटला जाण्यासाठी रात्री १०.३५ ची कुर्ला- कोईम्बतूर एक्सप्रेस असल्याने तब्बल पाच तासांचा मुक्काम आजीबार्इंचा प्रबंधक कार्यालयात होता. नाश्ता आणि रात्रीचे जेवण करून त्या एक्सप्रेसने आपल्या घराकडे रवाना झाल्या.दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तातडीने या वृद्ध महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन तिला सर्वतोपरी मदत करून आपल्या नातलगांपर्यंत जाण्याकरता मदत केल्याबद्दल प्रवासी संघटना आणि ज्येष्ठ नागरिकांकरता काम करणारे कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रशासनाचा हा अनुभव सुखद असल्याचे त्यांनी सांगितले.रेल्वे प्रशासनामुळे आपण घरी जात आहे. तसेच पुन्हा मुलाच्या तारखेला ठाण्यात आल्यावर मोठ्या मुलाला घेऊन प्रबंधक कार्यालयाचे आभार मानणार आहे. - लक्ष्मीबाईआमच्या परीने त्या आजीबार्इंच्या सुनेचा शोध घेतला. पण,ती सापडली किंवा आली ही नाही. तसेच आजीबार्इंना तिकीट आणि पुढील खर्चासाठी पैसे देऊन एक्सप्रेसमध्ये बसवले.- एस.बी. महिदर, रेल्वेप्रबंधक

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वे