शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत हरवलेली दागिन्यांची बॅग पुन्हा महिलेच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 05:45 IST

रेल्वे प्रवासात हरवलेली पनवेल येथील महिलेची बॅग तिला पुन्हा मिळाली आहे.

ठाणे : रेल्वे प्रवासात हरवलेली पनवेल येथील महिलेची बॅग तिला पुन्हा मिळाली आहे. मुंब्रा आरपीएफच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ही बॅग परत मिळाली असून त्यामध्ये दोन लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने होते.शुक्रवारी दुपारी मुंब्रा रेल्वेस्थानकात आरपीएफचे कर्मचारी गस्त घालत असताना स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर एक बॅग असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या बॅगेत सोन्याचे दागिने होते. बॅग ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्यानंतर एका महिलेने बॅग ओळखली.ही महिला शीळफाटा येथून मुंब्रा येथे रिक्षातून येत असताना तिच्याशेजारी बसलेल्या महिलेची बॅग असल्याची माहिती तिने आरपीएफच्या कर्मचाऱ्यांना दिली. या महिलेला सोबत घेऊन आरपीएफने रिक्षाचालकाचा शोध सुरू केला.हा रिक्षाचालक स्थानकाबाहेर भाड्याची प्रतीक्षा करत उभा होता. महिलेने रिक्षाचालकाला ओळखल्यानंतर या बॅगेविषयी शीळफाटा येथे कोणी चौकशी करत आहे का, याबाबत तेथील रिक्षाचालकांकडे विचारपूस करण्याविषयी आरपीएफने त्याला सांगितले. यात एक व्यक्ती तिकडे चौकशी करत असल्याची बाब समोर आली. त्यानुसार, आरपीएफच्या अधिकारी, कर्मचाºयांनी शीळफाटा येथे धाव घेतल्यानंतर जनार्दन गोंधळी हे या बॅगेचा शोध घेत असल्याचे दिसून आले. नेमकी बॅग हरवली कोठे, याबाबत काहीच समजत नव्हते. आरपीएफने ही बॅग मुंब्रा रेल्वेस्थानकात मिळाली असल्याची गोंधळी यांना माहिती दिली.गोंधळी यांची पत्नी निर्मला (५०), रा. तळोजा, पनवेल या शुक्रवारी दिव्याला निघाल्या होत्या. रिक्षाने मुंब्रा येथे आल्यानंतर दागिन्यांची बॅग मुंब्रा रेल्वेस्थानकात विसरल्या होत्या. मात्र, आरपीएफच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे गोंधळी यांना बॅग पुन्हा मिळाली. मुंब्रा आरपीएफ कार्यालयात बोलावून घेऊन ती बॅग निर्मला यांच्या स्वाधीन केल्याची माहिती आरपीएफचे उपनिरीक्षक ए.के. यादव यांनी दिली.