शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत बॉम्बची अफवा पसरवणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:24 IST

घरातून निघताना उशिर झाल्याने आईची गाडी चुकू नये

कल्याण : घरातून निघताना उशिर झाल्याने आईची गाडी चुकू नये, यासाठी पोलीस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून उद्योगनगरी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती देणाऱ्या श्रवण कुमार (रा. वांगणी) याला रेल्वे पोलिसांनी पाच महिन्यांनी अटक केली आहे. रेल्वे न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.श्रवणच्या आईला २८ जानेवारीला पाटणा येथे जायचे होते. त्यासाठी त्याने ‘उद्योगनगरी’चे तिकीट आरक्षित केले होते. ही गाडी कल्याण स्थानकातून सायंकाळी ५.३० वाजता सुटणार होती. परंतु, वांगणी येथून निघताना त्याला आणि आईला उशिरा झाल्याने वेळेत कल्याणला पोहोचणे कठीण होते. त्यामुळे त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला निनावी फोन करून ‘उद्योगनगरी’मध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. मात्र, तोपर्यंत गाडीने कल्याण सोडले होते. रेल्वेने ही गाडी खर्डी येथे थांबवली. रेल्वे पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथकाला पाचारण केले. तीन तासांच्या तपासणीनंतर गाडीत काहीच संशस्यापद आढळले नाही. त्यामुळे या गाडीबरोबरच कल्याण-कसारा मार्गावरील उपनगरी लोकल, लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही तीन तासांचा खोळंबा झाला. पोलिसांनी निनावी फोन करणाºयांचा शोध घेणे सुरू केले. अखेर, पाच महिन्यांनंतर श्रवणला अटक करण्यास त्यांना यश आले.