शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर शहरातील अतिक्रमणे प्रशासनाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 16:04 IST

मीरा-भार्इंदरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणांवरील कारवाई प्रभाग अधिका-यांच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे टाळली जात असल्याने विश्वासार्हता गमावलेल्या प्रभाग अधिका-यांवर कारवाईचा भरोसा न ठेवता थेट वरिष्ठांच्या नियंत्रणाखाली लवकरच कारवाई केली जाणार आहे.

 - राजू काळे भार्इंदर  - मीरा-भार्इंदरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणांवरील कारवाई प्रभाग अधिका-यांच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे टाळली जात असल्याने विश्वासार्हता गमावलेल्या प्रभाग अधिका-यांवर कारवाईचा भरोसा न ठेवता थेट वरिष्ठांच्या नियंत्रणाखाली लवकरच कारवाई केली जाणार आहे. तत्पूर्वी अतिक्रमणांची गोपनीय पाहणी अतिरिक्त आयुक्त सुधीर राऊत, उपायुक्त दीपक पुजारी व संबंधित पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षकांनी एकत्रितपणे सुरू केल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. शहरात अतिक्रमणांचा हैदोस सुरु असताना त्याकडे प्रभाग अधिका-यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकांकडुन केला जात आहे. अनेकदा तक्रारी करुनही आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या निर्देशानुसार त्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे कागदी आदेश प्रभाग अधिका-यांना बजावले जातात. त्यावर आयुक्तांना व्हाटस्अ‍ॅपवर तयार करण्यात आलेल्या ग्रुपवर ते अधिकारी किरकोळ वा थातुरमातुर कारवाई केल्याचे फोटो पोस्ट करुन आयुक्तांची शाबासकी मिळवतात. यात आयुक्तांचा  वेल डन या संदेशाची पोचपावती मिळविण्यासाठी धडपडणारे अधिकारी प्रत्यक्षात ठोस कारवाई न करता त्या अतिक्रमणांतील आपले हितसंबंध जपतात. ठोस कारवाई होत नसल्याने अवैध बांधकाम माफियांनी शहरात अतिक्रमणांचा हैदोस घातला आहे. प्रशासनाच्या परवानगीशी देणेघेणे नसलेले बांधकाम माफीया प्रभाग अधिका-यांशी संगनमत साधून आपले बांधकाम सुरक्षित करु लागले आहेत. त्यातच शहरात बेकायदेशीर लॉजिंग-बोर्डींगचा व्यवसाय जोरात सुरु असुन काही बारही अतिक्रमणांच्या जाळ्यात आणण्यात आले असताना त्यावर अद्याप ठोस कारवाई केली जात नाही. एखाद्या अतिक्रमणातील आर्थिक तडजोड फसल्यास एका तक्रारीवरच कारवाई केली जात असल्याचा आरोप अधिका-यांवर केला जात आहे. यामुळे प्रशासकीय कारभारातील भ्रष्ट व ढिसाळपणा चव्हाट्यावर येत असतानाही त्याची चाड मात्र कोणालाही वाटत नसल्याची चर्चा खुलेआम सुरु झाली आहे. अतिक्रमणांच्या सुळसुळाटामुळे आ. नरेंद्र मेहता यांनी तर काही अधिका-यांना फैलावर घेत कारवाई सुरु करण्याचे निर्देश नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत देण्यात आल्याचे एका अधिका-यांकडून सांगण्यात आले. त्याकडे दुर्लक्ष करुन कारवाईचा आलेख निचांकावरच आणण्यात संबंधित अधिकारी यशस्वी ठरु लागले आहेत. त्यांच्या या कामचुकारपणामुळे तसेच आयुक्तांच्या वेल डन च्या शाबासकीमुळे निर्ढावलेल्या अधिका-यांना अतिरीक्त आयुक्तांनी अनेकदा नोटीसा बजावुन कारवाईचे अल्टिमेटम दिले. या कागदी बाणांना प्रशासकीय कारभारात वजन नसल्याने कारवाई अद्याप शुन्यावरच असल्याचा आरोप केला जात आहे. अधिका-यांंच्या बेशिस्त व बेजबाबदार कारभारामुळे त्यांच्यावर कारवाईचा भरोसा न ठेवता थेट स्वत:च अतिक्रमणांची गोपनीय पाहणी करण्याचा निर्णय वरीष्ठ अधिका-यांंनी घेतला. त्यानुसार त्यांनी शहरातील अवैध लॉजिंग-बोर्डींगसह, बार, चाळी, झोपड्या व इतर अतिक्रमणांची मंगळवारपासुन गोपनीय पाहणी सुरु केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Governmentसरकार