शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडच्या गृहसंकुलात रहिवाश्यां मध्ये राडा

By धीरज परब | Updated: December 5, 2023 19:55 IST

मीरारोड - मीरारोडच्या रामदेव पार्क भागातील एका गृहसंकुलात दुरुस्ती काम व स्ट्रक्चर ऑडिट वरून रहिवाश्यांचा आपसात तुंबळ राडा झाला. ...

मीरारोड - मीरारोडच्या रामदेव पार्क भागातील एका गृहसंकुलात दुरुस्ती काम व स्ट्रक्चर ऑडिट वरून रहिवाश्यांचा आपसात तुंबळ राडा झाला. नवघर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या फिर्यादी वरून गुन्हे दाखल केले असून चार जणांना अटक केली आहे. 

रामदेव पार्क भागात आयडियल एन्क्लेव्ह जवळ महावीर नगर इमारत आहे .  इमारतीच्या दुरुस्ती कामाच्या अनुषंगाने स्ट्रक्चर ऑडिट साठी शेखावत कंस्ट्रक्शनचे कर्मचारी ३ डिसेम्बरच्या रात्री इमारतीत आले होते . त्यावेळी प्रमोद सिंह, नितेश झा , युवराज सिंग , कमलेश झा व विनोद सिंग ह्या ५ रहिवाश्यांनी येऊन काम करण्यास रोखले . जो पर्यंत गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र खरात हे राजीनामा देत नाही तो पर्यंत काम होऊ देणार नाही असे धमकावले . खरात सह कृष्णकुमार पांडे व प्रशांत तिवारी हे मध्यस्थी करण्यास गेले असताना त्या ५ जणांनी शिवीगाळ करत मारहाण सुरु केली . त्यात कृष्णकुमार यांच्या डोक्यात धारदार वस्तूने मारले .  कृष्णकुमार याना वाचवायला त्यांची आई व पत्नी मध्ये आले असताना त्यांना सुद्धा शिवीगाळ , मारहाण केली अशी फिर्याद कृष्णकुमार यांनी दिल्याने ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर विनोदकुमार सिंह यांनी दिलेल्या फिर्यादी वरून नवघर पोलिसांनी रवींद्र व त्यांची पत्नी मीनाक्षी खरात ,  कृष्णकुमार पांडे व पत्नी आणि बहीण पूजा , कोमल पांडे , श्याम पांडे , पप्पू पांडे , राहुल पांडे , रवी सैनी , अजय तिवारी , दक्ष व दीपक सोळंकी आणि राहुल त्रिपाठी ह्या १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सोसायटीच्या बिल्डिंग रिपेरिंग साठी स्ट्रक्चर ऑडिटचे काम मला कल्पना न देता सुरु करू नका असे विनोदकुमार यांनी सांगितल्याने त्यांना पट्ट्याने मारहाण केली . त्यांची पत्नी , दोन मुलं , भाऊ व पुतण्या मध्ये पडले असता त्यांना सुद्धा मारहाण केल्याचे नमूद आहे. 

या प्रकरणी नवघर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या फिर्यादी वरून गुन्हे दाखल करून दोन्ही बाजू कडील प्रत्येकी २ जण प्रमाणे एकूण चौघांना अटक केली आहे . उपनिरीक्षक व्हास्कोटी हे तपास करत आहेत . 

टॅग्स :mira roadमीरा रोड