शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी जागेवर असलेल्या झोपड्या त्वरित हटवा, उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:34 IST

रस्ता रूंदीकरणाच्या आड येणाऱ्या झोपड्या एका खाजगी जागेत स्थलांतरीत केल्या होत्या. कुणीचीही परवानगी न घेता या ठिकाणी १०० हून अधिक झोपड्या बांधल्या होत्या.

पंकज पाटीलअंबरनाथ : रस्ता रूंदीकरणाच्या आड येणाऱ्या झोपड्या एका खाजगी जागेत स्थलांतरीत केल्या होत्या. कुणीचीही परवानगी न घेता या ठिकाणी १०० हून अधिक झोपड्या बांधल्या होत्या. या संदर्भात उच्च न्यायालायत याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने अतिक्रमण हटवण्याचे आदेश या आधीच दिले होते. मात्र कारवाईच्या दिवशी झोपडपट्टीधारकांनी पावसाळा असल्याचे कारण पुढे करत मुदतवाढीची मागणी केली होती. मात्र २२ जूनच्या सुनावणीत न्यायालयाने कोणतेही कारण न ऐकता आठवड्याभरात कारवाईचे आदेश दिले आहे. त्यामुळे झोपडपट्टीधारकांवर ऐन पावसाळ््यात बेघर होण्याची वेळ आली आहे.उल्हासनगर- अंबरनाथच्या मध्यभागी साईबाबा मंदिराजवळ रस्त्याच्याबाजूला असलेल्या ५० ते ५५ कुटुंबियांना रस्ता रूंदीकरणात आपली झोपडी तोडून स्थलांतरीत होण्याची वेळ आली होती. या झोपडपट्टी धारकांना ही जागा सोडण्यासाठी एका खाजगी व्यक्तीने परस्पर विम्को कंपनीजवळील मोकळ्या भूखंडावर १०० हून अधिक झोपड्या उभारल्या. काही रक्कम आकारून साईबाबा मंदिराजवळील झोपडपट्टीधारकांचे स्थलांतर करण्यात आले. मात्र ज्या जागेवर नव्या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या ती जागा एका खाजगी व्यक्तीची असून त्याने ती जागा कर्जासाठी बँकेकडे तारण ठेवली होती. त्यामुळे या जागेवरून झोपड्या हटवण्याची मागणी बँकेकडून करण्यात आली. मात्र या झोपड्यांवर कारवाई न झाल्याने संबंधीत बँक आणि जमीनमालकाने उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने संबंधित झोपड्या हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार आणि पालिका कार्यालयांची एकत्र कारवाई करणार होते. मात्र कारवाईच्या दिवशीच रहिवाशांनी पावसाळा संपत नाही तोवर मुदत मागितली होती. कारवाई झाल्यास कुटुंब उघड्यावर येतील याची कल्पना देण्याचा निर्णय झाला.