शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांचे प्रश्न साहित्यात उमटावेत- फादर फ्रान्सिस दिब्रेटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 01:11 IST

देशापुढे आर्थिक पातळीवरचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचा प्रश्न आहे.

ठाणे : देशापुढे आर्थिक पातळीवरचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचा प्रश्न आहे. अनेक उद्योगधंद्यांना टाळे लागत आहे. एकेका कार्यालयातील शेकडो कर्मचारी बेकार होणार आहेत, त्यांच्या घरातील चुली पेटणार नाहीत या प्रश्नांचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे, असे मत संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी ठाण्यात व्यक्त केले.अ. भा. मराठी साहित्य परिषद, पुणे, ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने मंगळवारी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचा जाहीर सत्कार मराठी ग्रंथ संग्रहालय येथे करण्यात आला. ते पुढे म्हणाले, आज जर कविता लिहायची असेल तर ती शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन लिहीली पाहिजे. त्यांचे पिकवलेले सगळेच वाहून गेले आहे. त्यांच्या डोळ््यांतील अश्रू वाचता आले पाहिजे हे सांगताना ते म्हणाले की, एकांत, चिंतन केल्याशिवाय, तिºहाईकाच्या नजरेने पाहिल्याशिवाय, दीपस्तंभ होऊन गेलेल्या व्यक्तींच्या साहित्याचे वाचन केल्याशिवाय कविता होत नाही. अशा प्रकारचे साहित्य हे टिकून राहते. शेक्सपिअर कधीच जुना झाला नाही. त्याने वास्तवावर कधी दुर्लक्ष केले नाही. त्याकाळी त्याने जे लिहीले ते वास्तव होते असे ते म्हणाले.अशोक बागवे म्हणाले की, स्वत:ला स्वत:चा आरसा म्हणून पाहणे म्हणजे कवितेची निर्मिती होय. तुमची कविता तुम्ही स्वत: लिहीली असेल तर ती मोबाईल घेऊन कावाचता अशी टीका करून ते म्हणाले, शब्दांनासुद्धा हृदयाच्या रक्तापर्यंत जाण्याची सवय असली पाहिजे.कवी आकृती निर्माण करतो पण कृती का करत नाही असा प्रश्न उपस्थित करत आता कृतीची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. कवींनी आपल्यानंतर येणाºया कवींना जपले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या ‘खिल्ली’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिबे्रटो यांच्या हस्ते झाले.यावेळी कवी शरद गोरे आणि ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, विजया माणगावकर, कार्यवाह परशुराम नेहेरे आदी उपस्थित होते. मीना पगारे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.।राजकारणावर कोपरखळीमहाराष्ट्राच्या लोकशाहीला हसावं की ठोकशाहीला हसावं कळत नाही अशी टिपणी करताना ज्येष्ठ कवी अशोक बागवे म्हणाले की, साहित्यिक हा एकनिष्ठ असतो. तो दलबदलू किंवा पक्षबदलू नसतो अशी कोपरखळीही त्यांनी मारली.