शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौर भगवान भालेराव यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; उल्हासनगर रिपाइंत उभी फूट? भाजपसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 15:57 IST

उल्हासनगर महापालिकेत रिपाइं आठवले गट भाजप ऐवजी शिवसेना महाआघाडी सोबत आहेत.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : देशासह राज्यात रिपाइं आठवले गटाची भाजपा सोबत आघाडी असताना उल्हासनगर महापालिकेत पक्षाचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे शिवसेना महाआघाडीत आहेत. दोन दिवसांपूर्वी पक्षाचे इतर पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपा सोबत आगामी महापालिका निवडणुकी बाबत चर्चा केल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊन पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उल्हासनगर महापालिकेत रिपाइं आठवले गट भाजप ऐवजी शिवसेना महाआघाडी सोबत आहेत. दरम्यान महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतांना, भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेच्या लिलाबाई अशान व रिपाइंचे भगवान भालेराव याना मतदान केल्याने ते महापौर, उपमहापौर पदी निवडून आले. तसेच स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने भाजपाचे बंडखोर समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक अनुमोदक दिले. तर एका भाजप सदस्यांने समिती सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने, पाटील स्थायी समिती सभापती पदी निवडून आले. शिवसेना महाआघाडीत रिपाइं असतांना, पक्षातील अनेकांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सोबत चर्चा केल्याने, रिपाइंतील वाद चव्हाट्यावर आला. 

भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, पक्षाचे प्रवक्ता मनोज लासी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी आदींनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर रिपाइंचे प्रदेश सचिव नाना पवार, माजी अध्यक्ष राजू सोनावणे, माजी नगरसेवक शांताराम निकम, पक्षाचे नेते अरुण कांबळे, महेंद्र बच्छाव, गौरव धावरे, तुकाराम सोनावणे आदी पक्षाच्या पदाधिकारी सोबत चर्चा केली. पक्षाची राज्य व शहर कार्यकारणी पक्षाचे राष्ट्रीय नेते व अध्यक्ष रामदास आठवले यांनी बरखास्त केल्याने, या चर्चेत दम नसल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली. तर पक्षाचे नेते व माजी नगरसेवक शांताराम निकम यांनी पक्षाची भाजप सोबत आघाडी असून शहर त्याला अपवाद नाही. असी प्रतिक्रिया दिली. शहर व पदाधिकारी कार्यकारणी बरखास्त केली असेलतर भालेराव शहराचे अध्यक्ष कसे काय? अशी प्रतिक्रिया दिली.

रिपाईची शक्ती विखुरलेली? 

शहर आंबेडकर आंदोलनाचे केंद्र असून रिपाईची शक्ती मोठी आहे. मात्र रिपाईची शक्ती अनेक गटातटात विखुरली असून आठवले गटाची ताकद शहरात आहे. तसेच पक्षाचे ३ नगरसेवक महापालिकेत असून पक्षाकडे भगवान भालेराव यांच्याकडे उपमहापौर पद आहे. भगवान भालेराव यांच्या एकले रे चलोच्या भूमिकेमुळे पक्षातील दुखावलेले पक्ष पदाधिकाऱ्यांनी भाजप सोबत आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आघाडीची सोबत केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर