शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

स्वच्छतेचे प्रश्नांकित दर्पण - लोकसहभागातून ‘स्वच्छता दर्पण’मध्ये राज्यात प्रथम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:59 IST

केंद्र सरकारच्या पेयजल स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेच्या कामांकरिता ‘स्वच्छता दर्पण’ या मूल्यांकनात ठाणे जिल्हा राज्यात प्रथम, तर देशात १२५ व्या क्रमांकावर आहे.

ठाणे जिल्हा हा २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार २३ मार्च २०१७ रोजी हगणदारीमुक्त घोषित करण्यात आला. या पायाभूत सर्वेक्षणामधून सुटलेल्या आणि शौचालय नसलेल्या कुटुंबांची संख्या (लॉब) चार हजार ३०२ होती. त्यापैकी तीन हजार ७०९ कुटुंबांना शौचालये बांधून पूर्ण करून देण्यात आली. त्याचे फोटो केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर पाठवण्यात आले.

जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या असून टप्पा-२ च्या पडताळणी प्रक्रियेत सर्व ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत. नादुरुस्त शौचालयांची संख्या तीन हजार ८९ आहे. त्यांची सर्व कामे पूर्ण करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंद केली आहे. ४३० ग्रामपंचायतींमधील ७७६ गावांच्या स्वच्छता इंडेक्सची माहिती आॅनलाइन करून घेण्यात आली आहे. जिल्ह्यात ८२२ स्वच्छताग्राहींची केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंद करण्यात आलेली आहे.हगणदारीमुक्त ग्रामपंचायतींमध्ये शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छताग्राही, जलसुरक्षक, शिपाई यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. ग्रामीण भागात १५० ग्रामपंचायतींमध्ये कला पथकाच्या माध्यमातून जाणीव-जागृती केली आहे. शंभर ग्रामपंचायतींमध्ये एलईडीद्वारे जागृती केली, तर एसटी महामंडळाच्या १६५ बसगाड्यांवर जाहिरातींद्वारे जागृती केली. ग्रामपंचायतस्तरावर सात हजार ५०० दिनदर्शिकांचे वाटप केले. गावखेड्यांमधील ५० हजार शौचालयांवर स्वच्छतेशी निगडित स्टीकर व १० हजार शोषखड्ड्यांचे स्टीकर लावले. स्वच्छता व शौचालयवापराची शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी ५३ जिल्हा परिषद गटांमध्ये स्वच्छतेचे मेळावे घेतले. महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी महिला मेळाव्यांवर भर दिला. मासिकपाळी व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा कार्यकर्ता आदींद्वारे प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी सर्व ग्रामसेवक, सरपंच यांच्या कार्यशाळा घेऊन शाश्वत स्वच्छतेचे १५५ आराखडे तयार करून घेतले. उर्वरित कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाचे १३४ बृहद्आराखडे तयार करण्यात आले आहेत व काही कामे प्रगतीपथावर आहेत. लोकसहभाग मोठ्या प्रमाणात मिळवून स्वच्छतेशी संबंधित उपक्रम राबवल्यामुळे ठाणे जिल्हा ‘स्वच्छता दर्पण’मध्ये राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करू शकला.(मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे)- शब्दांकन : सुरेश लोखंडेकेंद्र सरकारच्या पेयजल स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेच्या कामांकरिता ‘स्वच्छता दर्पण’ या मूल्यांकनात ठाणे जिल्हा राज्यात प्रथम, तर देशात १२५ व्या क्रमांकावर आहे. या यशस्वितेकरिता ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत२०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने काम केले. दोन वर्षांपूर्वी पायाभूत सर्वेक्षणानुसार ठाणे जिल्हा हगणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित झाला. त्यानंतर, जिल्ह्यात स्वच्छता टिकून राहावी, यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन जिल्ह्याचा ग्रामीण भाग ‘स्वच्छ-सुंदर’ राहावा, याकरिता सातत्याने प्रयत्न केले. 

टॅग्स :thaneठाणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान