शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांचा प्रश्न अधांतरीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:52 IST

केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांचा प्रश्न हा नेहमीच चर्चिला जातो.

कल्याण : केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांचा प्रश्न हा नेहमीच चर्चिला जातो. परंतु, यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघण्याची चिन्हे नाहीत. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू यांच्या कार्यकाळात मार्चमध्येही बैठक रद्द झाली होती. त्यानंतर, गुरुवार होणारी नगर पथविक्रेता समितीची बैठक अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली. ही बैठक पुढे ढकलली असली, तरी सलग दोन बैठका रद्द झाल्याने फेरीवाला संघर्ष समितीने नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाला फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचे सोयरसुतक नसल्याने बैठका वारंवार रद्द केल्या जात असल्याचा त्यांचाआरोप आहे.फेरीवाल्यांंचे पुनर्वसन करण्यासाठी केडीएमसीने आजवर कोणतीही ठोस कृती केलेली नाही. केडीएमसीने स्थापन केलेली शहर फेरीवाला समिती ही नगर पथविके्रता समिती म्हणून पुनर्जीवित केली आहे. या समितीचे अध्यक्ष आयुक्त हे स्वत: आहेत. या समितीत प्रमुख अधिकारी आणि फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही आहेत.फेरीवाला धोरणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मार्चमध्ये वेलरासू यांनी बैठक बोलावली होती. परंतु, त्यांना कामासाठी मंत्रालयात जावे लागल्याने बैठक रद्द झाल्याचे आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यावेळी पुढील तारीखही कळवलेली नव्हती. याबाबत, फेरीवाला प्रतिनिधींनी तेव्हाही नाराजी व्यक्त केली होती. प्रशासनाला फेरीवालाप्रश्नी कोणतेही गांभीर्य नसल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.दरम्यान, गुरुवारी पुन्हा नगरपथविक्रेता समितीची बैठक आयुक्त गोविंद बोडके यांनी बोलावली होती. आयुक्तांच्या दालनात सकाळी ११ वाजता ही बैठक होणार होती. परंतु, नगरपथ समितीच्या सदस्यांना पत्र पाठवून ही बैठक रद्द केल्याचे बुधवारी सांगण्यात आले. काही अपरिहार्य कारणांमुळे बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पुढील बैठक १५ मे ला दुपारी ३.३० ला होणार आहे.