शहरं
Join us  
Trending Stories
1
दबाव असणार भारतावरच, यजमानांना गृहीत धरणे धोक्याचे;अमेरिकेकडे गमावण्यासारखे काहीच नाही
2
केंद्रीय मंत्रिमंडळ नव्हे, तर हे परिवार मंडळ..! घराणेशाहीवर राहुल गांधींची टीका
3
फाजील आत्मविश्वास बाळगलेल्या नेत्यांना निकालाने दाखवला आरसा, संघाच्या मुखपत्राची टीका
4
गुंतवणुकीचा ओघ आटला, ४४ लाख एसआयपी बंद, अकाऊंट बंद करण्याचे प्रमाण एप्रिलच्या तुलनेत ८८% वाढले
5
पाकिस्तान अखेर जिंकला, पण संथ खेळीमुळे खड्ड्यात राहिला; १४ षटकांत जिंकायचं होतं, पण... 
6
जोडीदाराची निवड हा मुलीचा अधिकारच! केरळ हायकोर्टाने केलं स्पष्ट
7
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
8
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
9
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
10
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
11
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
12
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
13
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
14
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
15
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
16
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
17
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
18
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
19
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
20
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!

धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:45 PM

४३ इमारती तोडण्याची कारवाई मनपा प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार होती; मात्र याकडेही दुर्लक्ष झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : धामणकरनाका परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या कारभारामुळे शहरातील धोकादायक इमारतींची संख्या वाढत असून सद्य:स्थितीत ७८२ धोकादायक इमारती मनपा हद्दीत असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. यामध्ये २१0 इमारती अतिधोकादायक आहेत.यातील ४३ इमारती तोडण्याची कारवाई मनपा प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार होती; मात्र याकडेही दुर्लक्ष झाले आहे. या भीषण इमारत दुर्घटनेनंतर आता तरी मनपा प्रशासन धोकादायक इमारतींबाबत धोरण निश्चित करेल का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. शहरातील धोकादायक इमारतींमध्ये सुमारे २५ हजार कुटुंबे राहत असून सुमारे एक लाख नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.तीन वर्षांपूर्वी भिवंडीत विविध ठिकाणी झालेल्या इमारत दुर्घटनांमध्ये १९ जणांचा मृत्यू, तर ४२ जण जखमी झाले होते. त्यावेळी शासनाने दखल घेऊन अनधिकृत, धोकादायक इमारती तोडून टाकण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाने फक्त कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानल्याने पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महानगरपालिकेच्या एकूण पाच प्रभाग समित्या असून प्रभाग समिती क्र. १ मध्ये १६, प्रभाग समिती क्र. २ मध्ये १५९, प्रभाग समिती क्र. ३ मध्ये १0८, प्रभाग समिती क्र. ४ मध्ये २७८, प्रभाग समिती क्र. ५ मध्ये २२१ अशा एकूण ७८२ धोकादायक इमारती आहेत. या इमारतींमध्ये हजारो नागरिक राहत असून त्यांच्या जीवाला धोका असल्याची प्रचीती या दुर्घटनेतून आली आहे.782इमारतीधोकादायक210इमारतीअतिधोकादायक