शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बोगस टीसींवर क्यूआर कोडचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 05:52 IST

रेल्वे प्रशासनाचा अनोखा प्रयोग : ठाणे रेल्वे स्थानकातून प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी

ठाणे : बोगस टीसींद्वारे रेल्वे प्रवाशांची होणारी फसवणूक तसेच लूट आणि त्यातून रेल्वे प्रशासनाची होणारी बदनामी रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने अशा बोगस टीसींवर वॉच ठेवण्यासाठी ‘आयडी क्यूआरकोड’चा अनोखा पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्याची सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर ठाणे रेल्वेस्थानकात सुरुवात झाली आहे. या प्रोजेक्टमध्ये टीसींना दिलेल्या आयडीवरील क्यूआरकोड मोबाइलवर स्कॅन करताच क्षणार्धात बोगसपणा समोर येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मध्य रेल्वेच्या विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रॉबिन कालिया यांच्या संकल्पनेतून हे तंत्र तयार केले आहे. प्रवाशांनी आपल्या मोबाइलवरील पेटीएम, भीम अ‍ॅप वा इतर कोणत्याही ‘क्यूआर’अ‍ॅपद्वारे टीसींना दिलेला ‘क्यूआर’कोड स्कॅन करताच सर्व्हरशी कनेक्शन होऊन मोबाइलवर लिंक ओपन होईल. यामध्ये संबंधित टीसीच्या फोटोसह नाव आणि त्यांना रेल्वेकडून मिळणारा नंबर अशी सर्व माहिती मोबाइलवर दिसणार आहे. त्यातच, ठाण्यातील ज्या टीसींना हा आयडी मिळाला आहे, त्यांना तो गळ्यात घालण्याची सक्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यात पकडला मार्चमध्ये बोगस टीसीठाणे रेल्वेस्थानकात आलेल्या पवन एक्स्प्रेसमध्ये अखिलेश कुमार तिवारी (२१ रा. उत्तर प्रदेश) या उच्चशिक्षित तरुणाने टीसी असल्याची बतावणी करून त्या डब्यातील प्रवाशांकडून पैसे उकळले होते. यावेळी काही जणांनी आरडाओरड केली. ती लक्षात येताच, ठाणे रेल्वेस्थानकातील मंगेश कदम आणि मनोज शहाणे या टीसींनी त्याला पकडले. ही गाडी एलटीटी येथून सुटल्याने अखिलेश याच्याविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.ठाण्यात २१ स्टाफपैकी १७ जणांकडे आयडीठाणे रेल्वेस्थानकात एकूण टीसींचा २१ स्टाफ आहे. त्यातील तिघे रजेवर असून १८ पैकी १७ जणांना क्यूआरकोड आयडी दिले आहेत. त्यानुसार, ठाण्यातील टीसी हा नवा आयडी गळ्यात घालत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.