शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

पाण्यासाठी अधिकाऱ्यांना ठेवले कोंडून

By admin | Updated: January 5, 2017 05:31 IST

तारापुर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आत ठेवूनच नांदगांव तर्फे (तारापुर) च्या ग्रामस्थांनी मंगळवारी (दि ३) संध्याकाळी टाळे ठोकताच पाण्याच्या पाईप

बोईसर : तारापुर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आत ठेवूनच नांदगांव तर्फे (तारापुर) च्या ग्रामस्थांनी मंगळवारी (दि ३) संध्याकाळी टाळे ठोकताच पाण्याच्या पाईप लाईनचे लेखी आश्वासन देण्यात आले. नांदगांवच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच विधि मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यांत आलेल्या या आंदोलनात उपसरपंच शर्मीला राऊत सदस्य धीरज गावड विकास पाटील पांडुरंग महाले मनसे तालुका अध्यक्ष समिर मोरे यांच्या सह महिला व ग्रामस्त सहभागी झाले होते. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा च्या तारापुर विभागा तर्फे सीटीपीतून रासायनिक पाणी समुद्रात सोडण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईप लाईन च्या कामाच्या दरम्यान गावाला पाणी पुरवठा करणारी लाईन तोडल्याने ग्रामपंचायत चे सुमारे १५ ते २० लाखाचे नुकसान झाले असून तेव्हा पासून पाईप लाईन तुटलेल्या अवस्थेतच असून गावाला पाणी पुरवठा योजनेतुन पाणी मिळू शकले नाही.या बाबात २७ जानेवारी २०१६ पासून अनेक वेळा ग्रामपंचायती तर्फे लेखी निवेदन देवुनही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून दिशाभूल केल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाला टाळे ठोकुन अधिकाऱ्यांसह कर्माचाऱ्यांना कार्यालयातच बंद करून ठेवल होते त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.२००७ साली जलस्वराज मधुन नांदगांव गावात पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली परंतु आजतागायत पाणीपुरवठा झाला नाही. ग्रामस्थांनी एम आय डी सी कडे पाण्याची मागणी केली असता त्यांनी जिल्हा परिषद कडे बोट दाखवले होते तर लाखो रूपये खर्च करून ही योजना आजही बंद अवस्थेत आहे. महामंडळाचे ठाणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वस्तूस्थिती संगीतल्यानंतर आंदोलकांना १५ दिवसात पाईप लाईन दुरूस्ती चे काम करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)