शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व वैमनस्यातून खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 21:31 IST

मारहाण केल्याच्या रागातून अनिल थापा (२८, रा. नवी मुंबई, मुळ रा. नेपाळ) याच्या डोक्यात दगडाने प्रहार करुन त्याचा खून करणाºया सोलापूरच्या गणेश गायकवाड (२३) याला गुरु वारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्दे ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदेशपरिस्थितीजन्य पुरावा धरला ग्राहय

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मारहाण केल्याच्या रागातून अनिल थापा (२८, रा. नवी मुंबई, मुळ रा. नेपाळ) याच्या डोक्यात दगडाने प्रहार करुन त्याचा खून करणाºया सोलापूरच्या गणेश गायकवाड (२३) याला गुरु वारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. परिस्थितीजन्य पुरावा ग्राहय धरुन न्यायालयाने गुरुवारी ही शिक्षा सुनावली आहे.आरोपी गणेश हा मूळ सोलापूरचा असून आई- वडिलांच्या निधनानंतर तो तिथून नवी मुंबईत पळून आला होता. नवी मुंबईत तो कचरा वेचण्याचे काम करीत होता. मुळ नेपाळचा रहिवासी असलेला अनिल मात्र बेकार होता. दरम्यान, या घटनेच्या काही दिवसांपूर्वी गणेशने अनिल याला नाष्टयासाठी समोसे देऊ केले. त्यावेळी त्याने रागाच्या भरात मी भिकारी आहे का? असे म्हणून गणेशला मारहाण केली होती. त्याचीच सल गणेशच्या मनात होती. त्याचा काटा काढण्याचा विचार करीत असतांनाच दीड वर्षांनी अनिल हा नवी मुंबई सेक्टर एक येथील एका उद्यानामध्ये २७ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारच्या सुमारास एकटाच झोपल्याचे गणेशच्या निदर्शनास आले. अनिल झोपेत असतानांच गणेशने त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करीत त्याला गंभीर जखमी केले. नंतर तिथून तो पसार झाला होता. दरम्यान, अनिलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी नवी मुंबईच्या वाशी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाल्यावर यातील कथित आरोपी गणेशला वाशी पोलिसांनी त्याच रात्री अटक केली. याच खटल्याची ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश ताम्हणेकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. कनिष्ठ न्यायालयात आरोपीने दिलेला हल्ल्याचा कबूली जबाब तसेच घटना घडण्यापूर्वी त्या उद्यानातील माळयाने त्यांना एकत्र पाहिले होते, असे सबळ परिस्थितीजन्य पुरावे सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी न्यायालयात सादर करुन आरोपीला शिक्षा देण्यासाठी युक्तीवाद केला. त्याच आधारावर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय