शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांच्या स्वारीतून पुणेकरांची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 03:52 IST

आषाढी एकादशीला जाण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयाने नियोजित केलेल्या बसची बुकिंग जवळपास फूल झाली आहे.

- पंकज रोडेकर ठाणे : आषाढी एकादशीला जाण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयाने नियोजित केलेल्या बसची बुकिंग जवळपास फूल झाली आहे. यंदा नियोजित ७६ बस पंढरपूरच्या वारीसाठी सज्ज झाल्या असून पुण्यातून पंढरपूरला जाणाऱ्याची संख्या जास्त असल्याने त्यांच्या मदतीला ठाणेकर धावून गेले आहेत. त्यांच्या मागणीनुसार ठाणे विभागीय कार्यालयामार्फत ४० बस लवकरच पुण्याला रवाना होणार आहेत. त्यामुळे यंदा ठाणेकरांच्या स्वारीतून पुणेकर पंढरपूरची वारी करणार आहेत.२३ जुलैच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाणाºया भाविकांकरीता ठाणे परिवहन विभागाकडून ठाणे बस स्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड, बोरीवली नॅन्सी कॉलनी येथून १९ ते २९ जुलै दरम्यान एकूण ७६ जादा बस सोडण्याचे नियोजन आहे. तसेच २४ जुलैपासून चंद्रभागा बसस्थानक, पंढरपूर येथून परतीची वाहतुकीसाठी प्रवासांची गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया व आबाल वृद्धांना प्रवास सुखकर व्हावा म्हणून एकूण जादा बसपैकी १० टक्के बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचे बुकिंग एक महिना अगोदर उपलब्ध करून दिले आहे. परतीचे आणि ग्रुप पद्धतीने बुकिंगची व्यवस्था प्रत्येक बसस्थानकावर केली आहे. त्याचप्रमाणे ठाणे परिवहन विभागामार्फत जादा सोडण्यात येणाºया ७६ बसपैकी ६४ गाड्यांची तर पंढरपूरवरून ठाण्यात परत येणाºया १४ गाड्यांची बुकिंग आतापर्यंत फुल झाली आहे.‘‘ नियोजन केलेल्या बसपैकी ६४ जाणाºया आणि तेथून १४ येणाºया बस फुल झाल्या आहेत. तर,पुणेकरांसाठी पंढरपूरला जाण्यासाठी ठाणे परिवहन विभागामार्फत जवळपास ४० बस लवकरच रवाना होणार आहेत. तसेच पंढरपूर वारीला जाण्यासाठी लोकांची मागणी आल्यास आणखी बस वाढण्यात येतील.’’- शैलेश चव्हाण, विभागीय नियंत्रक, ठाणे परिवहन विभाग.