शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

नाल्यावर पावणेतीन कोटींचा पार्किंग प्लाझा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:38 IST

कचराळीतील प्रयोग आधीच अयशस्वी : शिवसैनिकांना खूश करण्यासाठी आणला प्रस्ताव

ठाणे : महापालिका मुख्यालयासमोर रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर उतारा म्हणून नाल्यावरील पार्किंगचा प्रयोग पालिकेने केला होता. परंतु, तो सपशेल फेल ठरला आहे. असे असतानाही आता दिवसेंदिवस वाढणाºया वाहनांची संख्या लक्षात घेऊन आणि शिवसेना नगरसेवकाने केलेल्या हट्टापायी महापालिकेने वागळ प्रभाग समिती क्षेत्रातील किसननगर शाखेजवळ असलेल्या नाल्यावर २ कोटी ६३ लाख ७२ हजार ३१४ रुपयांचा खर्चून पार्किंगची सुविधा देण्याची पावले उचलली आहेत. या ठिकाणी शिवसेनेची शाखा आहे, त्यामुळे या शाखेत सकाळ, सांयकाळच्या सुमारास कार्यकर्त्यांची गर्दी असते. त्यामुळे वाहने लावण्यासाठीदेखील येथे कसरत होते. त्यासाठीच हा प्रस्ताव पुढे आणला गेला का, असा सवालही आता उपस्थित झाला आहे.

कचराळी तलाव परिसरातील रस्त्यावर दुर्तफा होणाºया पार्किंगला आळा घालण्यासाठी ठाणे महापालिकेने प्रथमच नाल्यावरील पार्किंगचा प्रयोग राबवला आहे. यामध्ये ३० पेक्षा अधिक गाड्या पार्क करता येणार आहेत. ११ आॅक्टोबरला २०१५ रोजी या सुविधेचे उद्घाटन करून ती नागरिकांसाठी खुली केली आहे. वाहनचालकांनी तिचा फायदा घ्यावा, म्हणून रस्त्यावर नो पार्किंग झोन करण्याचा विचार पालिकेने केला होता. परंतु, हा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दीड कोटींचा खर्च केला आहे. असे असतानाही आजही गाड्या या ठिकाणी लागण्याऐवजी रस्त्यावरच उभ्या राहत आहेत. त्यामुळे हा प्रयोग फसला आहे. परंतु, आता प्रभाग क्रमांक १७ मधील किसनगर शाखेजवळ असलेल्या नाल्यावर तो केला जाणार आहे.

किसननगरची होणार कोंडी, क्लस्टर प्रस्तावित असल्याने खर्च जाणार वायाआधीच किसननगरचा भाग हा अतिशय गर्दीचा आहे. त्या ठिकाणी वाहने लावण्यासाठी तारेवरची कसरत होते. त्यातही या भागात क्लस्टर राबविले जाणार आहे. त्यामुळे या नाल्यावरील पार्किंगचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. असे असतांनाही पालिकेने शिवसेना नगरसेवकास खुश करण्यासाठी २ कोटी ६३ लाख ७२ हजार ३१४ रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या नाल्याची लांबी ५५ मीटर व रुंदी ६ मीटर एवढी असून, त्यावर आरसीसी बॉक्स कल्व्हर्ट टाकणे, तसेच त्यावर एक मजल्याचे मेकेनाईज पझल कार पार्किंग सिस्टम उभारली जाणार आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक कॅबिन, नाल्याच्या भिंतीवर अ‍ॅप्रोच तयार करणे आदींचा अंतर्भाव या कामात आहे.