शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात एकमेकांचे पाय ओढण्याचे काम सुरू: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By अजित मांडके | Updated: February 24, 2024 22:43 IST

स्पर्धेचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : राजकारणावर बोलत नाही, सध्या राजकारणात कबड्डी सुरू आहे. एक दुसऱ्याचे पाय ओढायचं काम सुरू असतं पण आपण आपलं काम करत असतो इकडे तिकडे बघायचं नाही आपलं काम करायचं असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला)सन २०२३-२४,ठाणे या स्पर्धेचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, क्रीडा मंत्रालयाचे उपसचिव सुनिल हांजे, क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के,महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे,मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी यांची उपस्थिती

आपले खेळाडू सध्या मैदान देखील गाजवत आहेत आणि म्हणून आपल्या मातीतला खेळ जगभर पोहोचवण्यासाठी अशा स्पर्धांचा मोठा हातभार लागणार आहे आणि म्हणून राज्यातील खेळाडूंना वाव मिळण्यासाठी त्यांच्यातील टॅलेंट, पोटेन्शिअल ला महत्व देणे महत्वाचं असल्याचे ही ते म्हणाले. अशा या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपल्या राज्याचे नाव लौकिक करू शकतात असेही ते म्हणाले. राज्य सरकारने 75 लाख रुपये या स्पर्धेसाठी दिलेत परंतु महापालिकेने एक कोटी अकरा लाख रुपये दिले याचा अभिमान आहे.

आपल्या राज्यातले खेळाडू खूप हुशार आहेत बुद्धिमान आहेत, टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये आणि म्हणून आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची बक्षिसांची रक्कम देखील वाढवलेली आहे. तर यावेळी त्यांनी येथे सुरू असलेल्या स्पर्धेचं बक्षीस वाढवत पहिले बक्षीस 5 लाख, दुसरे 3 लाख आणि तिसरे बक्षीस 2 लाख त्यांनी जाहीर केले. हा देश आहे आणि मग तरुणाईला अशा प्रकारच्या खेळातून संधी  श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगीतिले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे