शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

युवादिनी जिल्हाभर जनजागृती

By admin | Updated: August 12, 2016 02:12 IST

जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्ती व गरोदर माता यांच्या केलेल्या एचआयव्ही (एड्स) तपासणीत मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील १९ ते २९ या वयोगटांतील २१ ते २४ टक्के युवकांना

पंकज रोडेकर ल्ल ठाणेजिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्ती व गरोदर माता यांच्या केलेल्या एचआयव्ही (एड्स) तपासणीत मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील १९ ते २९ या वयोगटांतील २१ ते २४ टक्के युवकांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक बाब आंतरराष्ट्रीय युवादिनी समोर आली. ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये ‘एड्सविषयी’ जनजागृती मोहीम राबवली जात आहे. तसेच यंदाचे ‘युवकांचा दीर्घकालीन विकासासाठी पुढाकार’असे या दिनाचे घोषवाक्य आहे.आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारे ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या संस्थेमार्फत एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रा (आयसीटीसी) मार्फत सर्वसामान्य व्यक्ती आणि गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी केली जाते. त्यानुसार, मागील दोन वर्षांत एचआयव्हीसंबंधित केलेल्या एकूण तपासणीत १९ ते २९ वयोगटांतील २१ ते २४ टक्के युवकांना त्याची लागण झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. एकूण तपासणीत निदर्शनास येणारी एचआयव्हीबाधित युवकांची संख्या लक्षात घेऊन युवकयुवतींना जागरूक करणे, हीच काळाची गरज बनली आहे. तसेच वाढते प्रमाण कमी करणे, हे एक आव्हान असून त्याला वेळीच आळा घालण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एड्सविषयी जिल्हा प्रशासनामार्फत जनजागृती मोहीम राबवली जाते. त्या मोहिमेंतर्गत प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक व पाठपुराव्यामार्फत उपक्रम राबवून आजच्या युवा पिढीला या आजारापासून लांब ठेवण्यासाठी याविषयी विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत. शुक्रवारी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक केम्पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाढवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांत एड्सविषयी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच एनकेडी महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धा घेण्यात येत आहे. एड्सविषयी महाविद्यालय स्तरावर रेड रिबन क्लबची स्थापना केली आहे.