शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘प्लास्टिक बंदी’च्या तोंडावर जनजागृती

By admin | Updated: July 17, 2017 01:04 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने १५ जुलैपासून महापालिका क्षेत्रात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी अंमलात आणली. ती लागू होताना जाग

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने १५ जुलैपासून महापालिका क्षेत्रात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी अंमलात आणली. ती लागू होताना जाग आल्यासारखी पालिकेने फलक लावून जागृती केली. पण कोणतेही नियोजन नसताना आणि पर्यायी व्यवस्था न करता लागू केलेल्या या बंदीबाबत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसंदर्भात महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मध्यवर्ती शहर स्वच्छता समितीची घोषणा करण्यात आली. लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक आणि पत्रकारांचा समावेश असलेल्या समितीने कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्याचे आवाहन महापौरांनी केले.प्लास्टिक मुक्तीत लोकसहभाग महत्वाचा असून लोकांनीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. पालिका कल्याण व डोंबिवलीत प्लास्टिक कलेक्शन सेंटर उघडणार आहे. नागरिकांनी या सेंटरवर प्लास्टिक जमा करावे. लवकरच ओला व सुका कचरा वर्गीकरण करु न स्वीकारला जाणार आहे. त्याची सवय नागरिकांनी लावून घ्यावी. गणेशोत्सव काळात मंडळांनी कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्त शहर संकल्पनेचे देखावे सादर करून जागृती करावी, असे आवाहन महापौरांनी केले. या व्यतिरिक्त प्रभाग स्तरावर आणि महापालिका नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापन केली जाणार आहे. समितीची रचना त्रिस्तरीय असेल.