सुरेश काटे, तलासरीतलासरीत पासिंग टोळ्यांचा हैदोस सुरू होणार हे लोकमतने केलेले भाष्य गुरूवारी वास्तवात उतरले. पोलीस उपनिरिक्षक मुल्ला यांच्यावर आज दुपारी १२ वा. च्या दरम्यान दापचरी तपासणी नाक्यावर अवजड वाहने पास करणाऱ्या टोळ्यांनी खुनी हल्ला केला यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.गुन्ह्याच्या तपासासाठी ते जात असताना उड्डाणपुलाजवळ या अत्यंत रहदारीच्या ठिकाणी दुपारी १२ वा. च्या दरम्यान हत्यारासह दबा धरून बसलेल्या पासिंग टोळीतल्या ८ ते १० जणांनी त्यांच्यावर खुनी हल्ला केला. एकाने त्यांच्यावर चाकूने वार केला तर दुसऱ्याने त्यांच्या अंगावर कार घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या टोळक्याने त्यांना रस्त्यात लाथाबुक्यानी मारहाणही केली. काहीजण धावून आल्याने हल्लेखोर पळून गेले.महामार्गावरील दापचरी तपासणी नाका हा अवजड वाहने पास करणाऱ्या पासिंग टोळ्यामुळे संवेदनशील बनला आहे. या नाक्यावरील पासिंग टोळ्यांनी तलासरी भागात थैमान घातले आहे. शासकीय यंत्रणेने जोपासलेल्या या टोळ्या सध्या शासकीय यंत्रणेलाच डोईजड झाल्या आहेत. त्याचेच प्रत्यंतर आज तलासरी नाक्यावर आले. जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावरच खुनी हल्ला भर रहदारीच्या ठिकाणी होत असेल तर सामान्यांचे काय? हा प्रश्न येथील जनता पोलीस यंत्रणेला विचारत आहे.हे वृत्त समजताच डहाणू उपविभागीय अधिकारी (प्रांत) अंजली भोसले, तलासरीचे तहसिलदार गणेश सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पानकर, आ. पास्कल धनारे, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी तलासरी ग्रामीण रूग्णालयात भेट देऊन मुल्ला यांच्या प्रकृतीची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.अप्पर अधिक्षकांची तलासरीला भेटपालघर जिल्ह्याचे पोलीस अप्पर अधिक्षक बी. यशोद यांनी पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शांतता व मोहल्ला कमिटीच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लीमबांधवांना शुभेच्छा देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. पोलीस उपनिरिक्षक ए. मुल्ला यांना मारहाण झाल्यानंतर तलासरीत घबराट निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून देऊन, याबाबत हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. जनतेने निश्चिंत राहावे असे सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांवरच जर हल्ले होऊ लागले तर आदिवासी भागात आम्ही काम करायचे असे, पासिंग टोळ्या डोईजड झाल्या आहे. - पोलीस
पीएसआय मुल्लांवर हल्ला
By admin | Updated: September 25, 2015 02:10 IST