शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पीयूसी केंद्रांची आरटीओकडून झाडाझडती ; ६७ वाहनांवर ८८ हजारांची दंडात्मक कारवाई

By अजित मांडके | Updated: November 10, 2023 17:56 IST

वाहनातील उत्सर्जित धुरावाटे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग सतर्कतेने काम करतो आहे. वाहनाबरोबर पीयूसी केंद्राची तपासणी मोहीम सुरू केली आहे.

ठाणे-: मुंबई असो या ठाणे या सारख्या शहरांमध्ये वाढत्या हवेतील प्रदूषणाबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्याच अनुषंगाने ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) काम लागले आहे. त्या विभागाने शहरातील  पीयूसी केंद्रांची झाडाझडती सुरू केली आहे. तसेच गेल्या नऊ दिवसात वाहनांची पीयूसी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये ६७ वाहनांवर ८८ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.  हवेतील वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे .

वेळीच उपाय शोधला नाही तर मोठा चिंतेचा विषय बनू शकतो. त्यामुळे वाहनातील उत्सर्जित धुरावाटे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग सतर्कतेने काम करतो आहे. वाहना बरोबर पीयूसी केंद्राची तपासणी मोहीम सुरू केली आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात १ ते ९ नोव्हेंबर या दिवसात वाहनाच्या पीयूसी तपासणी ६७ वाहनांची पीयूसी नसल्याचे आढळून आले आहे. यावेळी दोषी वाहन धारकांना पीयूसी चलान देऊन ८८ हजारांचा दंड वसूल केला असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी दिली.

* आरटीओचे या मार्गांवर ठेवले लक्षशहरातील प्रमुख रस्त्यावर सकाळी अथवा संध्याकाळच्या वेळेत वाहनाच्या गर्दीतून वाट काढताना, वाहनातील धुराचा त्रास प्रकर्षाने जाणवतो. मात्र अशा प्रदुषण करणाऱ्या वाहनावर ठाणे आरटीओची करडी नजर आहे. गेल्या नऊ दिवसात द्रुतगती मार्ग, घोडबंदर रोड बरोबर शहरातील प्रमुख रस्त्यावर विभागाचे वायूवेग पथकाने वाहने आणि पीयूसी केंद्र लक्ष केली आहेत. "  काहीजण याकडे दुर्लक्ष करत,  बिनधास्त वाहतुकीचे नियम मोडत आहेत. अशा वाहनावर दंडात्मक कारवाई सुरू असून वाहन मालकांनी त्वरित गाडीचे पीयूसी प्रमाणपत्र घ्यावे. "- जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे .

टॅग्स :thaneठाणेRto officeआरटीओ ऑफीस