शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजवण्यासाठी १२ कोटींची तरतूद, स्थायी समितीत मुद्दा गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 04:19 IST

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांमधील चरी भरण्याच्या कामासाठी १५ कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासनाने जानेवारीत मंजुरी दिली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांमधील चरी भरण्याच्या कामासाठी १५ कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासनाने जानेवारीत मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता पुन्हा खड्डे भरण्यासाठी १२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण केल्यावर खड्डे बुजवण्यावरील खर्च वाचेल, असा दावा महापालिकेकडून केला जात होता. मात्र, तो फोल ठरला आहे.पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यानंतर आणि वर्षभर खड्डे भरण्यासाठी महापालिकेने १२ कोटींची तरतूद केली आहे. प्रशासनाने या खर्चाला मंजुरी दिली आहे. मात्र, महापालिकेच्या स्थायी समितीने जानेवारीत रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या चरी भरण्यासाठी १५ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीवर एकूण २७ कोटी रुपये खर्च येणार आहे. इतका मोठा खर्च करून खड्डे बुजवले जाणार नसतील तर हा पैसा जातो कुठे?, त्याच्या नोंदी कशा ठेवल्या जातात, केवळ काम झाले असे भासवले जाते का, असा मुद्दा शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला.त्यावर शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी म्हणाले, खड्डा बुजवला की, त्याचा गुगल मॅप घेतला जातो. त्याठिकाणची इमेज काढून त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाच्या योग्य प्रकारे नोंदी ठेवल्या जात नाहीत, हा आराप चुकीचा आहे. खड्डे भरण्याच्या कामाचे लेखा परीक्षण होते. त्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी दोन अभियंत्याची नेमणूक केली होती. त्यांच्या अहवालानंतर काम योग्य झाले आहे का, गुणवत्ता राखली गेली आहे का, याची शहानिशा करूनच कंत्राटदाराला बिले दिली जातात, असे सांगितले. त्यावर मागील वर्षीच्या कंत्राटदाराला अजूनही बिले दिलेली नाहीत, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.दरम्यान, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत ४०२ कोटी खर्चून काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यावेळी हे रस्ते केल्यास खड्डे बुजवण्यास येणारा खर्च वाचेल, असे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतरही खड्ड्यांवर खर्च होत आहे.>अन्यथा परिस्थिती बिकट२७ गावांतील रस्ते अत्यंत खराब आहेत. त्यावर पॅच वर्क करावे लागणार आहे. अन्यथा पावसाळ्यात तेथील परिस्थिती अधिक बिकट होईल, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.