शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन सेवा द्या, नाही तर सर्व मार्ग एसटीला द्या

By admin | Updated: April 20, 2017 23:58 IST

सर्व मार्गांवर परिवहन सेवा देता येत नसेल तर सर्वच मार्ग एसटी महामंडळाला द्या, असे आदेश हायकोर्टाने वसई विरार महापालिकेला दिले आहेत

वसई : सर्व मार्गांवर परिवहन सेवा देता येत नसेल तर सर्वच मार्ग एसटी महामंडळाला द्या, असे आदेश हायकोर्टाने वसई विरार महापालिकेला दिले आहेत. वसईतील बससेवेचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी एसटी महामंडळ आणि वसई विरार महापालिकेची आहे. या बाबत कसा मार्ग काढणार यासंबंधी पुढील सुनावणीच्या वेळी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने एसटी महामंडळ आणि महापालिकेला दिले आहेत. डॉमणिका डाबरे आणि शारीयन डाबरे यांनी वसईत एसटीची शहर बससेवा सुरु रहावी यासाठी याचिका दाखल केली आहे. गेल्या सुनावणीत हायकोर्टाने बस सेवा सुरु ठेवण्याचे आदेश एसटी महामंडळाला दिले होते. तसेच एसटी आणि महापालिकेला पुढील सुनावणीच्या वेळी बाजू मांडण्याचे आदेश दिला होता.त्यासंंबंधी गुरुवारी हायकोर्टात सुनावणी झाली. महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. दामले यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. तर एसटी महामंडळाच्या वतीने अ‍ॅड. देशमुख यांनी बाजू मांडली. जागेअभावी महापालिका २१ मार्गावर बससेवा सुरु करू शकत नाही. एसटीेने आम्हाला भाडे तत्वावर जागा द्यावी, असे अ‍ॅड. दामले यांनी महापालिकेच्यावतीेने सांगितले. त्यावर महापालिकेला आपली जबाबदारी निभावता येत नाही याचा आम्हाला खेद वाटतो, अशा शब्दात हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. आम्हाला याबाबत सर्वसामान्यांची काळजी आहे. एक तर महापालिकेने सर्व मार्गावर परिवहन सेवा चालवावी. अथवा एसटी महामंडळाला सर्व मार्ग द्यावेत. मार्ग निवडायचे असतील तर महामंडळाला अधिकार देऊन त्यांना पाहिजे ते मार्ग त्यांनी प्रथम निवडावावेत असे मत हायकोर्टाने मांडले. २०१२ पासून आपण परिवहन सेवा सुरु केली. मात्र, जनतेचे हित पाहण्याऐवजी नफा कसा कमावता येईल असे कसे पाहता? असे खडे बोलही हायकोर्टाने महापालिकेच्या वकिलांना सुनावले. हा तिढा सोडवण्याची जबाबदारी एसटी आणि महापालिकेची आहे. त्यांनी तो कसा सोडवणार याबदद्लचे प्रतिज्ञापत्र पुढील सुनावणीच्यावेळी सादर करावे, असे आदेशही हायकोर्टाने दिले. त्यामुळे पुढच्या सुनावणीत दोन्ही बाजूंच्या भूमिका स्पष्ट होणार आहेत. तोपर्यंत २१ मार्गावर एसटीची बससेवा सुरु राहणार आहे.(प्रतिनिधी)