शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व पक्षीयांकडून जोशी बेडेकर महाविद्यालयाबाहेर आंदोलन; गुन्हा दाखल करण्याची मागणी

By अजित मांडके | Updated: August 4, 2023 16:48 IST

एकूणच एका मागून एक होणाऱ्या या आंदोलनामुळे महाविद्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

ठाणे - ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या कनिष्ठ विद्यार्थ्यांना शिस्तीच्या नावाखाली वरीष्ठ एनसीसी कॅडेटकडून झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद शुक्रवारी देखील अधिक तीव्र स्वरुपात उमटल्याचे दिसून आले. ठाण्यातील सर्व पक्षीयांनी महाविद्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. यात राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, कॉंग्रेस आणि मनसे देखील आघाडीवर असल्याचे दिसून आले. सकाळपासून एका मागोमाग एक आंदोलन झाले. त्यानंतर संबंधितावर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दिवसभर राजकीय पक्षांकडून आंदोलन सुरु असल्याने त्या महाविद्यालयाच्या गेटला छावणीचे स्वरूप आले होते.

शुक्रवारी सकाळी सर्वात आधी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रसचे ठाणे शहराध्यक्ष विरु वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला, तसेच मारहाण करणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली.  त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत, महाविद्यालय प्रशासनाने त्याच्या विरोधात एफआरआय नोंदवावा, तसेच कॉलेजच्या गेटला लॉक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न ठाणे नगर पोलिसांनी हाणून पाडला. याप्रसंगी माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांच्या आदी उपस्थित होते.

त्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने कॉलेजकडे धाव घेत आंदोलन केले. युवा - युवतीसेनेचे पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेऊन जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्य सुचित्रा नाईक आणि पोलिस उपायुक्त परिमंडळ १ चे गणेश गावडे यांना पत्राद्वारे संबंधितावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन मुंबई युवासेना कोर कमिटी यांनी सेंट्रल मैदान येथील पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयात भेट घेऊन थेट प्राचार्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले.त्यानंतर मनसेने देखील महाविद्यालयावर धडक देत आंदोलन केले. यावेळी मनसेचे शहर प्रमुख रवि मोरे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी देखील संबधीतावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी केली.

ठाणे शहर कॉंग्रेसेचे प्रवक्ते सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी एन.एस.यु.आय या विद्यार्थ्यी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत, कॉलेजच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यांना पत्राद्वारे संबंधितावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली. एकूणच एका मागून एक होणाऱ्या या आंदोलनामुळे महाविद्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.