शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

वीजकायदा २०२० च्या विरोधात ठाणे शहरासह ठिकठिकाणी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 00:52 IST

प्रस्तावित कायदा शेतकरी अन् ग्राहकविरोधी; कर्मचाऱ्यांनी केला आरोप

ठाणे : वीजकायदा २०२० या मूळ आराखड्याचे कायद्यात रूपांतर झालेले नसतानाही केवळ नोटिफिकेशन काढून तो उत्तर प्रदेशसह देशातील काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू असल्याने त्या विरोधात ठाणे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी महावितरण कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून त्याचा निषेध केला आहे.नवीन वीज कायद्याला विरोध करून उत्तर प्रदेशात कर्मचाºयांनी सोमवारी संप पुकारला होता. त्यांच्या या आंदोलनास येथील महावितरणच्या सर्कलमधील कर्मचाºयांनी पाठिंबा दिला आहे. यास अनुसरून त्यांनी वागळे इस्टेट, शिवाईनगर आदी ठिकाणी निदर्शने करून ठाणे जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्याचे नियोजन केल्याचे वीज क्षेत्र बचाव कृती समितीचे निमंत्रक विवेक महाले व लिलेश्वर बनसोड यांनी सांगितले.केंद्र सरकारकडून वीजकायदा २०२० चा आराखडा प्रकाशित करून त्यावर सूचना व हरकती मागविल्या होत्या. प्रचलित नियमानुसार नव्या कायद्यावर संसदेत सविस्तर चर्चा तसेच प्राप्त सूचना व हरकतींचे समाधान करून कायदा पारीत करणे अपेक्षित आहे. परंतु, त्यानुसार कोणतीही अंमलबजावणी न करता, उत्तर प्रदेशासह अन्य काही राज्य व केंद्र शासित प्रदेशात तो लागू करण्याचा प्रयत्न होत असल्याचे महाले यांनी सांगितले.नव्या कायद्याने यांचे होणार नुकसानया प्रस्तावित कायद्याने शेतकरी, सबसिडीधारक वीजग्राहक यांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. राज्यांचे अधिकार काढून घेतले जाणार आहेत. शिवाय, वीज उद्योगातील खाजगीकरण वाढणार असल्यामुळे कार्यरत कर्मचाºयांवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. बेरोजगारीही वाढणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सार्वजनिक उद्योग हे खाजगी भांडवलदारांच्या ताब्यात जाऊ नये, ही प्रमुख भूमिका वीज क्षेत्र बचाव कृती समितीची आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :electricityवीज