सदानंद नाईक, उल्हासनगर : धोबी खदान रस्त्यातील खड्ड्यात मनसे पदाधिकारी योगीराज देशमूख यांनी आंघोळ करून महापालिका कारभाराचा निषेध केला. गेल्या दोन महिन्यापासून रस्त्यातील खड्डा का भरला जात नाही, असा प्रश्नही देशमूख यांनी महापालिकेला केला.
उल्हासनगर महापालिकेने गणेश उत्सव दरम्यान रस्त्यातील खड्डे भरण्यावर कोट्यावधीचा खर्च करूनही खड्डे जैसे थें आहे. कॅम्प नं-२ घोबीघाट रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असून मनसेचे मैनूद्दीन शेख यांनी त्यासाठी सहकाऱ्यांसह धरणे आंदोलन केले. खड्डे भरण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र रस्त्यातील खड्डे जैसे थें आहे. बुधवारी दुपारी मनसेचे योगीराज देशमूख यांनी धोबीघाट रस्त्यातील खड्ड्याच्या निषेधार्थ खड्ड्याचत साचलेल्या पाण्याला स्विमिंग पूल नाव देऊन त्यामध्ये आंघोळ केली. अश्या खुनी खड्ड्यात अपघात झाल्यास महापालिका जबाबदार राहणार असल्याचे देशमूख म्हणाले. याबाबत महापालिका शहर अभियंता निलेश सिरसाठे यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.