शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन; कंत्राटी कामगारांचे उपोषण

By सदानंद नाईक | Updated: August 9, 2023 18:06 IST

उल्हासनगर महापालिका विविध विभागात ठेकेदाराद्वारे शेकडो कंत्राटी कामगार घेण्यात आले.

उल्हासनगर : महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी केलेल्या उपोषणांनंतर नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाची प्रत दिली नसल्याच्या निषेधार्थ कायद्याने वागा संघटनेचे राज असरोंडकर यांच्यासह अन्य जणांनी महापालिका मुख्यालय समोर ठिय्या आंदोलन केले. संगनमताने चाललेला भ्रष्टाचार उघड करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.

 उल्हासनगर महापालिका विविध विभागात ठेकेदाराद्वारे शेकडो कंत्राटी कामगार घेण्यात आले. तसेच कोरोना महामारीच्या वेळी महापालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटी वॉर्डबॉय यांचा ठेका संपल्याचे सांगून कामावरून कमी केले. दरम्यान कोरोना रुग्ण वाढणार या भीतीने, राजकीय दबाव आल्याने, ठेकेदाराद्वारे कंत्राटी पद्धतीने त्यांना कामावर घेतले. मात्र ठेकेदार कमी वेतन देत असल्याचा आवाज त्यांनी उचलताच ठेकेदाराचा ठेका मुदत संपल्याचे कारण देऊन रद्द केला. त्यामुळे वॉर्डबॉय यांचा संसार उघडयावर आला. तोच प्रकार इतर कंत्राटी कामगारांचा असून त्यांनाही शासनाच्या नियमानुसार वेतन न देता, कमी दिल्याचा प्रकार राज असरोंडकर यांनी उघड केला. तसेच याविरोधात उपोषण केले. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी असरोंडकर यांनी उपोषण मागे घेण्यासाठी, कंत्राटी कामगाराच्या कमी वेतना बाबत एका समितीची स्थापना केली. मात्र समितीच्या अहवालाची प्रत महापालिका असरोडकर यांना देत नसल्याने, त्यांनी सहकार्यासह महापालिका मुख्यालय समोर बुधवारी भ्रष्टाचारी चलो जाओ असे म्हणत ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

 ९ ऑगस्ट पासून महापालिका अधिकाऱ्यांविरोधात 'चलेजाव' लोकचळवळ सुरू केल्याचे असरोंडकर म्हणाले. 'भ्रष्टाचारी चले जाव' हे आंदोलन केवळ कंत्राटी कामगारांच्या प्रश्नापुरतं मर्यादित असून उल्हासनगर महानगरपालिकेत बोकाळलेल्या एकूणच भ्रष्टाचाराविरोधात आहे. या भ्रष्टाचाराला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचंच पाठबळ असल्याचा गंभीर आरोप राज असरोंडकर यांनीकेला असून त्यामुळेच मनपा आयुक्तांपासून कोणीही अधिकारी सर्वसामान्यांच्या कोणत्याही तक्रारींना जुमानत नसल्याचं प्रतिपादन असरोंडकर यांनी केलं आहे. भ्रष्टाचार आणणार चव्हाट्यावर महापालिकेचा एकून कारभार पाहता, राज्य सरकारकडून कारवाईची अपेक्षा नसल्याने 'भ्रष्टाचारी चले जाव' मोहिम सुरू केली. या मोहिमेत सर्व सामान्य नागरीक सहभागी होणार असून शहरात फिरून, महापालिका प्रशासन, राजकीय पक्ष, नेते व सरकार यांचा संगनमताने चाललेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार असल्याचा इशारा असरोंडकर यांनी यांनी यावेळी दिला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर