शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अनोप मंडल संस्थेचा जैन समाजाकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 07:55 IST

समाज बांधवांनी केले आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

ठाणे : जैन आचार्य यांचा पुतळा जाळून त्यांचा अवमान करणाऱ्या तसेच समाजाची बदनामी करणाऱ्या अनोप मंडल या संस्थेचा ठाण्यातील तमाम जैन बांधवांनी रविवारी सकाळी टेंभी नाका येथील श्री ऋषभदेव महाराज जैन धर्म मंदिर याठिकाणी निषेध करीत आंदोलन केले. या आंदोलनामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच ठाण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे यासंबंधी कारवाईचे निवेदन जैन संघटनेच्या वतीने देण्यात आले.श्री राजस्थान श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ, ठाणे आणि श्री ऋषभदेवजी महाराज जैन धर्म टेम्पल अ‍ॅन्ड ज्ञाती ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम सोलंकी तसेच व्यवस्थापकीय विश्वस्त उदय परमार यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनोप मंडल ही जैन आणि हिंदूविरोधी संघटना असून, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा आणि उत्तरप्रदेशातील ग्रामीण भागात जैन धर्म, जैन साधू आणि साध्वी यांच्याविरूद्ध लोकांच्या मनात विपर्यास्त विचार पसरविण्याचे काम करीत आहे.भारतासह जगभरात येणारे प्रत्येक संकट आणि नैसर्गिक आपत्तीला जैन लोक कारणीभूत असल्याचा अपप्रचारही ही संघटना गावागावात करीत आहे. जैन साधू आणि साध्वी यांनी काळी जादू करून महापूर, कोरोनासारखे साथीचे आजार आणल्याचाही या अपप्रचारात समावेश आहे. रस्ते अपघातात अनेक पायी जाणाऱ्या जैन साधू आणि साध्वींचे अपघाती निधन झाले आहे. शेकडो साधूंच्या या अपघाती मृत्यू होण्यामागेही अनोप मंडल संघटनेचा हात असण्याची भीतीही जैन संघटनेने व्यक्त केली आहे. अनोप मंडलची चौकशी केली जावी. या संस्थेचे प्रमुख मुकनाराम प्रजापती यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर कडक कारवाई करावी, त्याचबरोबर या संस्थेकडून चालविण्यात येणारे संकेतस्थळ, ट्विटर, एफबी, व्हॉट्सअ‍ॅप आणि यूटयूबसारखी सोशल मीडियाची खातीही बंद करावीत, तसेच या मंडळाविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली