शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

नवीन पत्रीपुलाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:01 IST

रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे सादर; मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉकचेही नियोजन नाही

- अनिकेत घमंडीडोंबिवली : कल्याणमधील ब्रिटिशकालीन १०४ वर्षांचा पत्रीपूल पाडण्याचे काम महिनाभरपासून खोळंबले आहे. नव्या पुलासाठी रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे, अशी माहिती रेल्वेच्या अभियंत्यांनी दिली. पूर्ण पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेला विशेष ब्लॉक घ्यावे लागणार असून, त्याचेही नियोजन झालेले नाही. त्यामुळे एमएसआरडीसी समोरही पेच असून काम सुरू करायचे असले तरी रेल्वेच्या तांत्रिक बाबींची पूर्तता होत नसल्याचे स्पष्ट झाले.जुना पत्रीपूल पाडण्याच्या कामास सप्टेंबरपासून सुरुवात झाली. त्यावेळी केवळ पुलावरील डांबर उखडण्यात आले. मात्र, त्यानंतर पूल पाडण्याचे काम महिनाभरापासून खोळंबले आहे. त्यासाठी विशेष मेगाब्लॉक घ्यावे लागणार आहेत. उपनगरी आणि लांबपल्ल्यांच्या गाड्यांच्या प्रचंड व्यस्त वेळापत्रकामध्ये हे विशेष ब्लॉक कसे, कधी घ्यायचे, हा मोठा प्रश्न आहे. त्याचेही नियोजन होत नसल्याने रेल्वे अधिकाऱ्यांसमोरही पेच निर्माण झाला आहे. तसेच रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांकडेही नव्या पुलाची परवानगी प्रलंबित आहे.दरम्यान, जुन्या पुलावरून जाणारी वाहतूक शेजारील अरुंद पुलावरून वळवण्यात आली आहे. तेथे वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याने कल्याण-डोंबिवलीकर त्रस्त आहेत. गोविंदवाडी बायपास, तसेच ९० फुटी रस्त्याने ये-जा करणाºया वाहनांना दीड तास खोळंबून राहावे लागत आहेत. शिवाजी चौक ते पत्रीपूल, असा दुतर्फा प्रवास नकोसा झाला आहे. इंधन व वेळेचा अपव्यय, यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. त्यातच अपुरा पोलीस कर्मचारी वर्ग असल्याने समस्येत आणखी वाढ होत आहे. तसेच दिवसेंदिवस वाढणारी कोंडी, बंद असलेल्या पुलावरून होणारी पादचाºयांची ये-जा, यामुळे तेथे अपघाताची शक्यता आहे.मनसेचे शनिवारी ठिय्या आंदोलनपत्रीपुलानजीच्या वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या वतीने मनसे शनिवारी पत्रीपुलानजीक ठिय्या आंदोलन करणार आहे. पुलाच्या दुतर्फा ठिय्या मांडून पूल पाडणार कधी, नवा कधी बांधणार, तोपर्यंत नागरिकांनी काय करायचे असा सवाल करत हे आंदोलन होणारच, असे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले. नागरिकांनी किती काळ आणि का घुसमट सहन करायची असे ते म्हणाले. आपापल्या परीने सहभागी होण्यासाठी वाहनचालकांनी काळे झेंडे, काळ्या रिबिन वाहनांवर बांधाव्यात आणि निषेध व्यक्त करावा, असेही आवाहन कदम यांनी केले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली