शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यातून फोडणार प्रचाराचा नारळ

By admin | Updated: February 15, 2017 04:39 IST

ठाण्यापेक्षा दिव्यात अधिक हजेरी लावणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या प्रचाराची सुरूवातही त्याच भागातून करणार असल्याने

ठाणे : ठाण्यापेक्षा दिव्यात अधिक हजेरी लावणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या प्रचाराची सुरूवातही त्याच भागातून करणार असल्याने दिव्यातील प्रश्नांवर ते कोणती भूमिका घेतात याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी ठाण्यात विकासकामे केल्याबद्दल आयुक्तांनी धमकी आल्याची तक्रार केल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटावरही ते भाष्य करण्याची शक्यता आहे.दिव्यातील नगरसेवकांची संख्या ११ वर गेल्याने यंदा प्रचारात राजकीय पक्षांसाठी दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. दिवा महोत्सवाला हजेरी लावून आणि वेगवेगळ््या प्रचार कार्यालयांचे उद््घाटन करून राज यांनी यापूर्वीच तेथे हजेरी लावली होती. पण त्यावेळी त्यांनी भाष्य करणे टाळले होते. पण पक्षाचे सरचिटणीस राजू पाटील यांना त्या भागावर लक्ष केंद्रित करण्यास सुचवले होते. त्यानंतर दिवा महोत्सवात कलावंतांना घेऊन आलेल्या अभिजित पानसे यांनी डम्पिंगजवळ झोपडीत राहून या प्रश्नाकडे मनसेचे लक्ष असल्याचे जाहीर केले. त्याच भागात बुधवारी राज यांची पहिली सभा होत असल्याने डम्पिंग, ठाण्यातील विकासकामे आणि दिव्याकडे झालेले दुर्लक्ष हे मुद्दे स्वाभाविकपणे प्रचारात येण्याची शक्यता आहे. त्याखेरीज माझ्या हाती सत्ता द्या, मी नाशिकसारखा दिव्याचा विकास करून दाखवतो, हा मुद्दाही राज प्रचारात मांडतील, असे मनसैनिकांचे म्हणणे आहे. नाशिक पॅटर्न पाहण्यासाठी मनसैनिकांच्या तुकड्या यापूर्वीच तेथे गेल्या होत्या. त्यामुळे त्या कामाची ठाण्याशी आवर्जून तुलना होईल, हे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या सभेबद्दल दिवा परिसरात उत्सुकता असल्याचे मनसे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. ठाण्यातील सेना-भाजपाची सत्ता, त्यातील भ्रष्टाचार, टीएमटीची अवस्था, विकासकामांना सहा महिन्यात मिळालेली गती आणि त्यामुळे आयुक्त संजीव जयस्वाल यांना आलेली धमकी- त्याबद्दल त्यांनी गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली तक्रार हे मुद्दे राज यांच्या भाषणात यावे, यासाठी पदाधिकाऱ्यांनी तशी माहिती पुरवल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)