शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू जागृतीच्या गणेशोत्सवात सजावटीतून संस्कृतचा प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:23 IST

होतोय भाषेचा जागर : भक्तांची देखावा पाहण्यास गर्दी

ठाणे : सुमारे पाच हजार वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या संस्कृत या प्राचीन भाषेविषयी जनजागृती करणारी सजावट हिंदू जागृती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने साकारली आहे. यात संस्कृत भाषेचा उगम झाल्यापासून तिचा ºहास कसा होत चालला आहे, असे अनेक मुद्दे मांडण्यात आले आहेत. ‘संस्कृत... वारसा संस्कृतीचा’ हा मंडळाचा यंदाचा विषय आहे.

१९९१ साली काही समविचारी तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम सुरू करण्याचे ठरविले. एखादा उपक्रम सुरू करताना धार्मिक आणि सामाजिक विचारांचा मेळ घडवून आणावा या उद्देशाने या मंडळाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ‘काळाची गरज हिंदू जागृती भक्तीतून करूया शक्तीची निमिर्ती’ हे ब्रीद गाठिशी घेऊन प्रथम गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मंडळाने नेहमीच या उत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक विषय हाताळले आहेत.

यंदाही संस्कृत भाषेविषयी प्रचार आणि प्रसार त्यांनी केला आहे. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ही सजावट साकारली आहे. महिनाभर मंडळाचे कार्यकर्ते ती साकारण्यात गुंतले होते. संस्कृत या विषयाकडे स्कोअरिंग विषय म्हणून पाहिले जाते.एकदा शिक्षण घेऊन झाले की, त्या भाषेकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जाते. या भाषेचा ºहास होत असून इंग्रजी भाषेचे आक्रमण कसे झाले आहे. हे या मंडळाने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. दृकश्राव्यच्या माध्यमातून हा देखावा दाखविला जात असल्याने तो जास्त आकर्षित ठरत आहे. तो पाहण्यासाठी ठाणेकरांची गर्दी होत आहे. संस्कृती ही भारतीय भाषा असली तरी पाश्चिमात्त्यांना तिचे जास्त आकर्षण राहिले आहे, त्यावर ते संशोधनही करीत आहेत आणि आपण फक्त इंग्रजी भाषेच्या मागे लागलो आहोत. त्यामुळे संस्कृत भाषेची नुसती प्रशंसा करून तिचा विकास होणार नाही तर दैनंदिन जीवनात तिचा वापर करावा, असा संदेश मंडळाने गणेशभक्तांना दिला आहे. 

टॅग्स :thaneठाणे