शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांनी रोखला फ्री वे

By admin | Updated: June 30, 2015 01:26 IST

ईस्टर्न फ्री वे’साठी (पूर्व मुक्त मार्ग) एमएमआरडीएने पाच वर्षांपूर्वी झोपड्या तोडण्यात आलेल्या झोपडीधारकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही.

मुंबई : ‘ईस्टर्न फ्री वे’साठी (पूर्व मुक्त मार्ग) एमएमआरडीएने पाच वर्षांपूर्वी झोपड्या तोडण्यात आलेल्या झोपडीधारकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. पुनर्वसनासाठी सरकारदरबारी खेटे घालणाऱ्या या झोपडीधारकांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसून एमएमआरडीएचे लक्ष आपल्या समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न केला. या प्रकल्पबाधितांनी सोमवारी फ्री वेवर रास्ता रोको आंदोलन छेडले.फ्री वे प्रकल्पाची तयारी २००७पासून सुरू झाली. या प्रकल्पात सुमारे पाच हजार झोपड्या बाधित होणार होत्या. या बाधितांचे पुनर्वसन पांजरापोळ, मानखुर्द, लल्लूभाई कम्पाउंड आणि गोवंडीत करण्याचे आश्वासन एमएमआरडीएने दिले होते. काही झोपड्या प्रकल्पाच्या सुरुवातीला, काही मध्यावर तर काही अंतिम टप्प्यात तोडण्यात आल्या. त्यातल्या काही झोपडीधारकांचे पुनर्वसन ठरल्याप्रमाणे झालेही. मात्र उर्वरित झोपडीधारकांना अपात्र ठरवून एमएमआरडीएने हात झटकले. पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत वणवण भटकणाऱ्या या झोपडीधारकांनी सोमवारी फ्री वे अडवला. त्यामुळे सकाळच्या घाईच्या वेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक तुंबली. गोवंडी, आरसीएफ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अखेर पोलिसांनी समजूत काढून झोपडीधारकांना तेथून हटवत रस्ता मोकळा केला. (प्रतिनिधी)