शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास नागरिकांच्याच पैशाची बचत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:25 IST

कल्याण : शहरातील प्रत्येक सोसायटीने ओला-सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प सोसायटीतच राबविल्यास नागरिकांच्याच पैशाची ...

कल्याण : शहरातील प्रत्येक सोसायटीने ओला-सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प सोसायटीतच राबविल्यास नागरिकांच्याच पैशाची बचत होईल, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

डोंबिवली पूर्वेतील महावीरनगर सोसायटीने ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ शनिवारी शिंदे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी केडीएमसीच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, पदाधिकारी राजेश कदम, भाजप माजी नगरसेविका सुनीता पाटील, संजय चौधरी आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, ‘ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण ही काळाची गरज आहे. केडीएमसी दीड वर्षापासून शून्य कचरा मोहीम राबवत असून, आतापर्यंत साडेतीन हजार टन ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली आहे. मनपा हद्दीतील जवळपास ५० मोठ्या सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. अनेक सोसायट्यांनी आपल्या आवारातच ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केल्यास मनपावरील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा भार कमी होईल. मनपा ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करते; परंतु त्यावर खर्च होणारा पैसा हा नागरिकांकडून करातून गोळा केलेला असतो. प्रक्रियेवरील मनपाचे पैसे वाचणार म्हणजेच जनतेच्या पैशाची बचत होईल. त्यामुळे सर्व लहान-मोठ्या सोसायट्यांनी ओला-सुका कचरा वर्गीकरणास सहकार्य करून शहर कचरामुक्त करण्याच्या मोहिमेस हातभार लावावा.’

--------------------------