शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जूनपासून होणार सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया

By admin | Updated: April 19, 2017 00:35 IST

उत्तन डम्पिंग प्रकरणी अखेर आयुक्त डॉ. नरेश गीते सोमवारी हरित लवादासमोर हजर झाले. यामुळे लवादाने जामीनपात्र वॉरंटचा आदेश मागे घेतला

मीरा रोड : उत्तन डम्पिंग प्रकरणी अखेर आयुक्त डॉ. नरेश गीते सोमवारी हरित लवादासमोर हजर झाले. यामुळे लवादाने जामीनपात्र वॉरंटचा आदेश मागे घेतला. तर उत्तन येथे घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू करून १० जूनपासून सुक्या कचऱ्यावर तर ३० नोव्हेंबर पासून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करणार असल्याची ग्वाही पालिकेच्या वतीने लवादाला देण्यात आली. उत्तन येथे पालिकेकडून बेकायदा कचरा टाकला जात असल्यामुळे नागरी हक्क संघर्ष समिती व सनी गाडेकर यांनी पश्चिम विभागीय हरित लवादाकडे याचिका दाखल केल्याने महापालिका चांगलीच कोंडीत सापडली आहे. लवादाच्या दट्यामुळे पालिकेने पुन्हा घनचकरा प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. लवादाने पालिकेला २० कोटी एस्क्रो खात्यात जमा करण्याच्या दिलेल्या आदेशाला पालिकेने सर्वोच्च न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवली आहे. तर उत्तन कचरा प्रकल्पासाठी महिन्याभरात कार्यादेश दिला नाही तर शहरातील नवीन बांधकाम परवानगी व भोगवटा दाखला देण्यावर बंदी आणण्याची तंबी लवादाने दिली असता राजकारणी, बिल्डर, पालिकेचे धाबे दणाणले होते. दरम्यान, मागील सुनावणीच्यावेळी आयुक्त लवादा समोर हजर न झाल्याने संतप्त होऊन लवादाने पालिकेच्या विधी अधिकारी यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. डम्पिंगचे महत्व आयुक्तांना नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत दीड कोटीचा दंड ठोठावायचा का ? असा सवालही केला होता. त्यावेळी लवादाने आयुक्तांविरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्याचे निर्देश दिले होते. सोमवारी आयुक्त डॉ. गीते हे लवादासमोर हजर झाले व आपल्या अनुपस्थितीबद्दलचे कारण सांगितले. तेव्हा लवादाने त्यांच्याविरूध्द काढलेला जामीनपात्र वॉरंटचा आदेश मागे घेतला. महापालिकेच्या वतीने लवादासमोर पालिकेकडून घनकचरा प्रकल्प सुरू करण्या बाबत सुरु असलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करण्यात आली. पालिकेने घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे कार्यादेश सूरतच्या सौराष्ट्र एन्व्हायरो कंपनीला दिले आहेत. रोजचा सुमारे ३८० टन कचरा निर्माण होत असून भविष्यात तो टप्प्याटप्प्याने वाढून ५०० ते ५५० टनापर्यंत जाणार आहे. सात वर्षासाठी हा प्रकल्प कंत्राटदार चालवणार असून नंतर तो महापालिकेला हस्तांतरित होईल. (प्रतिनिधी)