शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी

By admin | Updated: February 1, 2017 03:26 IST

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु, मंगळावारी सुमारे दोन ते तीन तास सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरणाऱ्यांची दमछाक उडाली होती.

 ठाणे : निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु, मंगळावारी सुमारे दोन ते तीन तास सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरणाऱ्यांची दमछाक उडाली होती. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक असल्याने आणि एकाही पक्षाकडून अद्यापही उमेदवारी यादी जाहीर न झाल्याने ज्या वेळेस ही यादी जाहीर होईल त्यानंतर तर आॅनलाईनवर झुंबड उडणार असल्याचे चित्र असणार आहे. त्यामुळे अशाच प्रकारे जर सर्व्हर डाऊन होत राहिले तर अर्ज भरायचे कसे असा सवाल आता इच्छुक उमेदवारांकडून केला जात आहे. ठाणे महानगर पालिकेच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून अद्यापही एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यातही बंडखोरी रोखण्यासाठी अद्यापही शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी किंबहुना मनसेकडूनही उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. शिवसेना आणि भाजपाची यादी २ फेब्रुवारी आणि त्यात दिवशी सांयकाळी उशिरा काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेच्या उमेदवाारंची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक राहणार आहे. त्यामुळे अशा वेळी आॅनलाईनवर मोठी झुंबड उडणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील दहा महापालिकांसाठी अशा प्रकारे एकच साईट असल्याने त्याठिकाणी इतर मनपामधील उमेदवारांचीही अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे. अशा वेळी जर सर्व्हर डाऊन झाले तर अर्ज भरायचे कसे असा सवाल आहे.