शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी

By admin | Updated: February 1, 2017 03:47 IST

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु, मंगळावारी सुमारे दोन ते तीन तास सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरणाऱ्यांची दमछाक उडाली होती.

ठाणे : निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु, मंगळावारी सुमारे दोन ते तीन तास सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरणाऱ्यांची दमछाक उडाली होती. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक असल्याने आणि एकाही पक्षाकडून अद्यापही उमेदवारी यादी जाहीर न झाल्याने ज्या वेळेस ही यादी जाहीर होईल त्यानंतर तर आॅनलाईनवर झुंबड उडणार असल्याचे चित्र असणार आहे. त्यामुळे अशाच प्रकारे जर सर्व्हर डाऊन होत राहिले तर अर्ज भरायचे कसे असा सवाल आता इच्छुक उमेदवारांकडून केला जात आहे. ठाणे महानगर पालिकेच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून अद्यापही एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यातही बंडखोरी रोखण्यासाठी अद्यापही शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी किंबहुना मनसेकडूनही उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. शिवसेना आणि भाजपाची यादी २ फेब्रुवारी आणि त्यात दिवशी सांयकाळी उशिरा काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेच्या उमेदवाारंची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक राहणार आहे. त्यामुळे अशा वेळी आॅनलाईनवर मोठी झुंबड उडणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील दहा महापालिकांसाठी अशा प्रकारे एकच साईट असल्याने त्याठिकाणी इतर मनपामधील उमेदवारांचीही अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे. अशा वेळी जर सर्व्हर डाऊन झाले तर अर्ज भरायचे कसे असा सवाल आहे.