शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

यंदा अकरावी प्रवेशाची समस्या

By admin | Updated: June 22, 2016 01:48 IST

ग्रामीण आदिवासी जिल्ह्यातील ३५ कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश क्षमता १ हजार ४०० एवढी मर्यादित असताना यंदा एसएससी परीक्षेत जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेल्या ४ हजार ६५४ विद्यार्र्थ्यांना आश्रम शाळांतील

हितेन नाईक,  पालघरग्रामीण आदिवासी जिल्ह्यातील ३५ कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश क्षमता १ हजार ४०० एवढी मर्यादित असताना यंदा एसएससी परीक्षेत जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेल्या ४ हजार ६५४ विद्यार्र्थ्यांना आश्रम शाळांतील कनिष्ठ महाविद्यालयात कसे सामावून घेणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नववी मध्ये ही प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळांचे दरवाजे बंद होण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी आदिवासी भागातील एकही विद्यार्थी प्रवेशा पासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही आदिवासी विकास व पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिलेली असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा पेच पालकमंत्री कसा सोडवितात याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.पालघर जिल्ह्यात डहाणू प्रकल्पातंर्गत कला शाखेची शासकीय सात तर विज्ञान शाखेचे एक कनिष्ठ महाविद्यालय असून जव्हार प्रकल्पांतर्गत कला शाखेची नऊ तर विज्ञान शाखेची दोन महाविद्यालये आहेत. ह्या व्यतिरिक्त खाजगी अनुदानीत महाविद्यालय अशी डहाणू प्रकल्पांतर्गत कला शाखेचे एक आणि विज्ञान शाखेची दोन महाविद्यालये तर जव्हार प्रकल्पांतर्गत कला शाखेची सात तर विज्ञान शाखेची सहा महाविद्यालये आहेत. प्रत्येक महाविद्यालयाची प्रवेश क्षमता फक्त चाळीस एवढी असल्याने जिल्ह्यातील ३५ महाविद्यालयात केवळ १ हजार ४०० च विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळू शकतो. त्या मुळे एसएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उर्वरित ३ हजार २५४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.पालघर जिल्ह्यातील ३५ कनिष्ठ महाविद्यालयाला प्रत्येकी एक तुकडी मंजूर आहे. त्या नुसार एका तुकडीत (वर्गात) ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. परंतु हा नियम पायदळी तुडवीत ४० निवासी आणि १० बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचे कळते. प्रत्यक्षात अनेक आश्रमशाळा, महाविद्यालयात ६० ते १०० विद्यार्थांना एका वर्गात प्रवेश दिला जात असून जव्हार प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळामधील १२ वीच्या विद्यार्थ्यांची संख्या तलवाडा १२४, चलतवाड १०५, चांभार शेत ७५, मोखाडा ९४, रानशेत ७२ अशी आहे. असे समीकरण असतांना एका तुकडीत क्षमते पेक्षा दुप्पट विद्यार्थी कोंबून बसविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे आदिवासी विभागातील एकही विद्यार्थी प्रवेशा पासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री सवरा एकीकडे देत असताना आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशा बाबत ठोस निर्णय लवकर झाला नाही तर आदिवासी मुले महाविद्यालयीन शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतील अशी शक्यता आहे.प्रत्येक महाविद्यालयात ४० विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची क्षमता असताना ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वर्गात कोंबून आदिवासी विभाग आपली सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते. परंतु एसएससी च्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीला सामावून घेण्याचा प्रयत्न जरी झाला तरीही दुप्पट विद्यार्थ्यांना सामावून घेऊनही हा गंभीर प्रश्न सुटू शकत नाही. आदिवासी विभागाला शासकीय तसेच अनुदानित आश्रम शाळांची किंवा वर्गांची संख्या वाढवावी लागणार आहे. परंतु त्याबाबत अद्याप कोणतीही हालचाल नाही.