शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रोबेस स्फोट प्रकरण : फॉरेन्सिकच्या अहवालाची प्रतीक्षा

By admin | Updated: September 23, 2016 03:09 IST

एमआयडीसीमधील प्रोबेस एंटरप्रायझेस कंपनीत २६ मे रोजी झालेल्या स्फोटानंतर फॉरेन्सिकतज्ज्ञांनी गोळा केलेले अवशेष तपासणीकरिता लॅबमध्ये धाडले असून त्याचा अहवाल साडेतीन

डोंबिवली : एमआयडीसीमधील प्रोबेस एंटरप्रायझेस कंपनीत २६ मे रोजी झालेल्या स्फोटानंतर फॉरेन्सिकतज्ज्ञांनी गोळा केलेले अवशेष तपासणीकरिता लॅबमध्ये धाडले असून त्याचा अहवाल साडेतीन महिने उलटले तरी अजून प्राप्त झालेला नाही. शिवाय, त्यास आणखी किती कालावधी लागेल, तेही स्पष्ट नसल्याने याबाबतच्या तपासाकरिता नियुक्त केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल जाहीर होऊ शकणार नाही. प्रोबेस स्फोटाचा अहवाल कधी येणार, असा सवाल केला असता त्यास आठवडा, महिना, सहा महिनेदेखील लागू शकतात, असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरात चौकशी समितीचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही फॉरेन्सिक अहवाल नसल्याने तपास समिती कूर्मगतीने शोध घेत आहे. दरम्यान, एकीकडे प्रोबेस स्फोटाच्या चौकशीला गती प्राप्त होत नसताना रविवारी रसायनमिश्रित लाल सांडपाणी डोंबिवलीतील नाल्यात सोडल्याचे छायाचित्र व्हायरल झाले. या परिसरातील अनेकांना श्वसनाचा त्रास झाला. मात्र, ते पाणी नेमके कोणी सोडले, याबाबतही गुप्तता पाळली जात असून ठोस कारवाई केलेली नाही. केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून प्रदूषण मंडळ शांत कसे बसू शकते, येथे नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, असा संताप नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. त्याच दिवशी सुटीच्या निमित्ताने बंद असलेल्या ‘हिंदुस्थान मोनोमर्स’ या कंपनीतून वायुगळती झाल्याने परिसरातील अन्य कंपन्यांच्या ९ कामगारांना त्रास झाला. पण, ती गळती झालीच कशी? त्यात कंपनीत नेमके कोण होते, हे सवालही अनुत्तरीतच आहेत.