शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

केडीएमसीच्या शाळेवर प्रिया यादवचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 18:08 IST

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हिंदी माध्यमिक शाळेत प्रिया यादव हिने शालांत परीक्षेत ९१ टक्के गुणांची कमाई केली. घरची परिस्थिती प्रतिकुलअसताना केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करणा-या प्रियाचे कौतुक केले जात आहे.

ठळक मुद्देप्रतिकुल परिस्थितीत शालांत परिक्षेत कमविले ९१ टक्के गुण

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हिंदी माध्यमिक शाळेत प्रिया यादव हिने शालांत परीक्षेत ९१ टक्के गुणांची कमाई केली. घरची परिस्थिती प्रतिकुलअसताना केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करणा-या प्रियाचे कौतुक केले जात आहे.प्रियाचे वडील प्रल्हाद यादव हे पानाची टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना केडीएमसीच्या शाळेत शिक्षणासाठी टाकले. मुलगी कुठल्या शाळेत शिकते यापेक्षा कशी शिक्षण घेते याकडे यादव दाम्पत्याने लक्ष केंद्रित केले होते. शाळा कोणतीही असो, परिश्रम घेतल्यास यश मिळते हे प्रियाने शालांत परीक्षेत दाखवून दिले. प्रियाच्या या यशामुळे तिच्या कुटुंबातील प्रत्येकाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपल्या यशामुळे आई-वडिलांची मान उंचावल्याचे प्रिया सांगते. महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती विश्वदीप पवार हे तिचे अभिनंदन करण्यासाठी घरी गेले असता तिच्या आई-वडिलांना प्रचंड आनंद झाला. पुढील शिक्षणासाठी आवश्यकता लागल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अभिनंदनासाठी शिवसेनेचे संदीप नाईक, तन्मय सारंग आदीही त्यांच्याकडे गेले होते.* शालांत परीक्षेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेतील हिंदी माध्यमिक विद्यालयाचा ६९ टक्के निकाल लागला आहे. परीक्षेत ८२ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या विद्यालयाचा २२ वर्षात प्रथमच ९१ टक्के मिळवले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण