शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर निलंबित उपशक्षिकास शिक्षण विभागाच्या उपक्रमात व्यासपीठावर बसवण्याचा बहुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 20:21 IST

पालिकेच्याच एका शिक्षिके कडुन वाढिव वेतनश्रेणी देण्यासाठी लाच घेताना अटक झालेल्या उपशिक्षक अनिल आगळे याला सेवेत घेतले नसताना देखील

मीरारोड - पालिकेच्याच एका शिक्षिके कडुन वाढिव वेतनश्रेणी देण्यासाठी लाच घेताना अटक झालेल्या उपशिक्षक अनिल आगळे याला सेवेत घेतले नसताना देखील ते शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमां मध्ये व्यासपीठावर चक्क अधिकारयां सोबत मांडीला मांडी लाऊन बसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाचखोरास सन्मानाचे स्थान दिले जात असल्याचे पाहुन शिक्षक वर्गात देखील खळबळ उडाली आहे.जुलै २०१७ मध्ये उपशिक्षक अनिल आगळे याला मीरा भार्इंदर महापालिकेच्या उर्दु शाळेच्या शिक्षिका फरीदा कुरेशी यांच्या कडुन ५ हजार रुपयांची लाच घेताना पालिका शाळेतच रंगेहाथ अटक करण्यात आले होते.कुरेशी यांची सेवेची १२ वर्ष पुर्ण झाल्या बद्दल त्या गेल्या काही वर्षां पासुन सातत्याने वाढिव वेतनश्रेणी मिळावी म्हणुन शिक्षण विभागा कडे मागणी करत होत्या.त्यावेळी मीरा गावातील पालिका शाळेत उपशिक्षक असलेल्या अनिल आगळे याने कुरेशी यांच्याशी संपर्क साधुन तुम्हाला वाढिव वेतनश्रेणी हवी असेल तर वरिष्ठांना ५ हजार रुपये द्यावे लागतील अशी पैशांची मागणी केली होती. कुरेशी यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार केल्या नंतर आगळे याला पैसे घेताना रंगेहाथ अटक झाली होती.आगळे उपशिक्षक असुनही शिक्षण विभागात ठाण मांडुन असत. प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख यांच्या सोबत ते सतत वावरत होते. आगळे याला पकडल्या नंतर अशाच प्रकारे अन्य शिक्षकां कडुन देखील पैसे उकळले गेल्याची शिवाय मुख्याध्यापकांची पदोन्नती, बदल्या आदिं मध्ये सुध्दा गैरप्रकार झाल्याचीचर्चा सुरु झाली.वाढिव वेतनश्रेणी मंजुर करण्यासाठी थेट शिक्षण विभागाचे उपसंचालक, विस्तार अधिकारी, ठाणे जिल्हा शिक्षण अीधकारी तसेच कार्यालयातील लिपीक व पालिका शिक्षण अधिकारयास पैसे द्यावे लागतात असे आगळे ने कुरेशी यांना सांगीतले होते.लाच घेताना पकडले गेल्या पासुन आगळे याला निलंबित करण्यात आले आहे. अजुनही पालिका सेवेत घेतलेले नाही. तसे असताना देखील आगळे शिक्षण विभागा कडुन राबवल्या जाणारया विविध उपक्रमांना हजेरी लावत आहेच. पण व्यासपीठावर चक्क मान्यवर म्हणुन शिक्षणाधिकारी बाबर व प्रशासन अधिकारी देशमुख यांच्या सोबत जाहिरपणे बसत असल्याचे पाहुन अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.तर या प्रकरणी शिक्षणाधिकारी यांनी मात्र, आगळे यांना लाच प्रकरणी अटक झाली होती व ते निलंबित असल्याची माहिती मला प्रशासन अधिकारी वा अन्य कोणी दिली नव्हती असे सांगीतले. परंतु मला ही बाब कळल्या पासुन आगळे यांना मनाई करण्यात आले आहे असे त्यांनी स्पष्ट केले .