शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील खासगी कर वसुली ठराव तापला ; काँग्रेस नगरसेवकांचे मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 19:42 IST

विविध पक्ष संघटनांसह अनेकांनी या ठरावास विरोध दर्शविला आहे. मंगळवारी सायंकाळी भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सुमारे २० नगरसेवकांनी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करीत हा ठराव रद्द करण्याची मागणी केली.

- नितिन पंडीत 

भिवंडी ( दि २२ ) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराला देण्यासंदर्भात ठराव पारित करण्यात आला आहे . विशेष म्हणजे या ठरावावरून शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहेत.

विविध पक्ष संघटनांसह अनेकांनी या ठरावास विरोध दर्शविला आहे. मंगळवारी सायंकाळी भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सुमारे २० नगरसेवकांनी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करीत हा ठराव रद्द करण्याची मागणी केली. यावेळी मनपा युक्त डॉ पंकज आशिया यांची आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन देखील मनपा आयुक्तांकडे दिले. या आंदोलनाप्रसंगी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड , प्रदीप राका, वसीम अन्सारी , फराज बाबा , जाकीर मिर्जा , सिद्धेश्वर कामूर्ती , जुबेर अंसारी , आरिफ खान , आबू सुफियान , अरुण राऊत , नासिर खान , मोहम्मद हुसेन , साद मोमीन, इरफान वायरमन , साजिद खान , राहुल पाटील , मुजाहिद अंसारी , साजिद अंसारी , अश्रफ मुन्ना आदी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.

दरम्यान आंदोलनादरम्यान आपण मनपा युक्तांची भेट घेतली असता सदरचा ठराव अजून माझ्यापर्यंत मंजुरीसाठी आलेला नाही , सदर ठराव माझ्याकडे आल्यानंतर त्यातील कायदेशीर बाबी तपासल्या जातील जर हा ठराव बेकायदेशीर असेल तर त्यास आपण मजुरी देणार नाहीत असे आश्वासन आम्हाला मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिले असून जो पर्यंत हा ठराव मागे घेत नाहीत तोपर्यंत आपण आंदोलन करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी नगरसेवक शोएब गुड्डू यांनी दिली आहे.