शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पेण टंचाई निवारणार्थ खासगी टँकर दाखल

By admin | Updated: April 14, 2016 00:09 IST

पेण पंचायत समितीने टंचाई कृती निवारण समिती आराखड्यानुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या ज्या प्रतिबंधक उपाययोजना आखलेल्या होत्या, त्यानुसार खासगी टँकर चालकांची गतवर्षीची

पेण : पेण पंचायत समितीने टंचाई कृती निवारण समिती आराखड्यानुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या ज्या प्रतिबंधक उपाययोजना आखलेल्या होत्या, त्यानुसार खासगी टँकर चालकांची गतवर्षीची देयके देण्याबाबत यशस्वी तोडगा निघण्याच्या आशा कायम झाल्या आहेत. अधिग्रहण झालेल्या ६ टँकरपैकी, १० हजार लिटर क्षमतेचे ३ टँकर १२ एप्रिलपासून पाणीपुरवठा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. लोकमतमधून या समस्येवर प्रकाश टाकून वृत्त प्रसिद्धी केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूत्रे हलविण्यात आली. अखेर खासगी टँकर पाण्याने भरून टंचाईग्रस्त वाडीवस्त्यांवर वेगाने पाणीपुरवठा करू लागले आहेत.पेणच्या ५७ वाड्यावस्त्यांसह अनेक गावांमध्ये कमी दाबाने नळाला पाणी येत असल्याने सर्वच ठिकाणी पाण्यासाठी धावपळ करावी लागते. महिलांना कपडे, भांडी व इतर वापरासाठी पाणी मिळत नाही. खारेपाटात गोड्या पाण्याचे स्रोत नसल्याने एकमेव टँकर अथवा नळपाणी योजनेच्या पाण्यावरच सर्व व्यवहार करावे लागतात. फेब्रुवारी अखेरपासूनचा टंचाईचा प्रवास जीपीएस यंत्रणेच्या नव्या फॉर्म्युल्यामुळे टँकर चालकांचे लेणदेण व्यवहार शासकीय नियमांच्या चौकटीत अडले होते. अखेर लोकमतने याची दखल घेत लोकआग्रह व प्रशासनाला जागे केले. लोकमतानुसार प्रशासनाला जागे करून अखेर खासगी टँकर चालकांना पाठबळ देणारे वृत्त व जनमताचा भक्कम पाठिंबा या हेतूपोटी लोकमतने दिलेला दणका प्रभावी ठरून खासगी टँकर सेवा सुरू झाली. वेळापत्रकानुसार पाणी देण्याची व्यवस्था सुरू आहे. थोड्याच दिवसात आणखी ३ टँकर रुजू होतील. सहा खासगी व २ शासकीय अशा ८ टँकरद्वारे गाव व पाड्यावर पाणपुरवठा होणार आहे. लोकमतच्या या भूमिकेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. (वार्ताहर)