शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी शाळा पालिका शाळांच्या मुळावर!

By admin | Updated: July 27, 2015 23:26 IST

सोयी-सुविधांअभावी कल्याण डोंबिवली महापालिकांच्या शाळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र असले तरी या शाळांभोवती वाढणारे खाजगी शाळांचे प्रस्थही पालिका शाळांमधील घटत्या

- प्रशांत माने,  कल्याणसोयी-सुविधांअभावी कल्याण डोंबिवली महापालिकांच्या शाळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र असले तरी या शाळांभोवती वाढणारे खाजगी शाळांचे प्रस्थही पालिका शाळांमधील घटत्या पटसंख्येला कारणीभूत ठरत आहे. शाळेच्या १ कि.मी परिसरात अन्य शाळेला परवानगी नाही असा नियम आहे. परंतु वस्तुस्थती पाहता याकडे शासनाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे.डागडुजीअभावी पालिकेच्या बहुतांश शाळा दुरावस्थेच्या गर्तेत सापडल्या असताना काही शाळांची स्थिती चांगली असल्याचेही दिसते. येथील वालधुनी परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर प्राथमिक विद्यालय पाहता याची साक्ष पटते. सुसज्ज दुमजली इमारतीत इयत्ता १ ली ते ७ वी चे मराठी माध्यमाचे वर्ग येथे भरतात. येथे नऊ शिक्षक कार्यरत असून उत्तम शिक्षण दिले जात असल्याचा त्यांचा दावा आहे. २०११-१२ मध्ये ही शाळेची नवीन वास्तू उभारण्यात आली. याआधी चाळ टाईप वास्तूत शाळा भरायची. येथे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार नियमितपणे दिला जातो. पाठ्यपुस्तके मिळाली आहेत. त्याचबरोबर वह्या आणि दप्तरांचे वाटप देखील सुरू झाले आहे. शिक्षणाला पोषक वातावरण येथे पहावयास मिळत असले तरी पटसंख्या समाधानकारक नाही. सध्या विद्यार्थी पटसंख्या १८९ असून बालवाडीत ७२ मुले शिकतात. या शाळेच्या आसपाास मोठ्या प्रमाणावर खाजगी शाळा आहेत. शाळा-शाळांमध्ये १ कि.मी चे अंतर बंधनकारक असताना हा नियम येथे पायदळी तुडविला जात असून शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी खाजगी शाळांच्या वाढत्या संख्येमुळे देखील या पालिका शाळेच्या पटसंख्येवर परिणाम झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. शाळेत पाच संगणक होते परंतु नादुरूस्त अवस्थेत आहेत. तर सफाई कर्मचारी देखील शाळेला दिला गेलेला नाही. याकडे शिक्षण मंडळाचेही दुर्लक्ष झाले आहे.